ओझरला विघ्नहरच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

ओझरला विघ्नहरच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

जुन्नर - अष्टविनायकांपैकी मुख्यस्थान असलेल्या श्री. क्षेत्र ओझर ता. जुन्नर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली होती. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सुर्यकांत रवळे, खजिनदार किसन मांडे विश्वस्त पांडुरंग जगदाळे, साहेबराव मांडे, प्रकाश मांडे, ज्ञानेश्वर कवडे, शंकर कवडे, बबन मांडे, अनिल मांडे व ग्रामस्थ अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत पहाटे श्रीच्या मूर्तीस अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. रात्री अकरापर्यंत रांगेत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

सकाळी व दुपारी महाआरती करण्यात आली. सकाळी नियमित पोथी वाचन करण्यात आले. नंतर’श्री”स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आले. भाविकांसाठी दर्शनरांग, पिण्याचे शुद्ध पाणी, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था, दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर बाग, पार्किंग व कमीत कमी वेळेत मुखदर्शन व्यवस्था करण्यात आली.

सायंकाळी नियमित हरिपाठ व चंद्रोदयापर्यंत संतोष महाराज सस्ते यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना रामप्रसादिक भजन मंडळ शिरोली खुर्द यांनी साथ दिली. अन्नदान भास्कर व विलास देवराम मांडे यांनी वारकऱ्यांना अन्नदान केले. रात्रौ शेजआरती करून मंदिर  दर्शनासाठी बंद करण्यात आले. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ,अध्यक्ष व कर्मचारी वर्ग यांनी नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com