palkahi.jpg
palkahi.jpg

#Saathchal : भक्तिमय वातावरणात तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ 

पिंपरी : आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात बुधवारी (ता. 26) पादुकांची महापूजा आणि आरती झाली. त्यानंतर पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. 

आकुर्डी येथे मंगळवारी (ता. 25) रात्री पालखीने विसावा घेतल्यावर रात्री कीर्तन व जागरण झाले. पहाटे आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरांच्या विश्‍वस्तांच्या वतीने महापूजा आणि आरती झाली. त्या वेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळाप्रमुख काशिनाथ मोरे, अजित मोरे, संजय मोरे, अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे उपस्थित होते. 

टाळमृदंगाच्या गजर करत पालखी मुंबई-पुणे महामार्गावरून पिंपरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा दर्शनसाठी गर्दी केली होती. शहरातील राजकीय, सामाजिक, धार्मिक संस्था आणि संघटनांनी अन्नदान केले. सकाळी सातच्या सुमारास पालखीने खराळवाडी येथील विठ्ठल मंदिरात विसावा घेतला. त्यानंतर पालखी दापोडीच्या दिशेने मार्गस्थ झाली. साडेदहाच्या सुमारास पालखी दापोडीने विसावा घेतला. सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी व परिसरातील भाविकांनी पिंपरी चिंचवड शहराच्या शेवटच्या टप्प्यात दापोडी येथे संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात स्वागत केले. 

पालखी दर्शनासाठी दापोडीसह परिसरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. विविध सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळांकडून ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. वारकऱ्यांच्या सेवेसाठी मंडळांकडून खिचडी, पाणी, महाप्रसाद वाटप करण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. पालखी मार्गाकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. तसेच अनुचित घटना घडू नये, म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com