पुणे : धम्मरत्न जावळे यांची युनेस्कोच्या 'गॅपमिल'साठी जागतिक युवादूत म्हणून निवड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पुणे : युनेस्कोच्या नेतृत्वातील ग्लोबल अलायन्स फॉर पार्टनरशिप ऑन मीडिया अँड इन्फॉरमेशन लिटरसी (GAPMIL) कडून जगातील विविध भागांत युनेस्कोच्या माध्यम आणि माहिती साक्षरतेसाठीच्या जागतिक कृती आराखड्यावर काम करण्यासाठी जगभरातून 12 युवादूतांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागातील पीएचडी संशोधक धम्मरत्न श्रीराम जावळे यांचा समावेश आहे. त्यांची आशिया-पॅसिफिक प्रदेशासाठी UNESCO-GAPMILचे जागतिक युवादूत म्हणून निवड झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

धम्मरत्न जावळे हे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागात पीएचडी संशोधक म्हणून कार्यरत आहेत. जावळे यांच्यासोबत आफ्रिका, अरब राज्ये, युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांतील अन्य युवादूतांचाही समावेश आहे. सर्व युवादूत GAPMIL च्या जागतिक युवक समितीचे २०१९-२०२१ या कालावधीसाठी सदस्य म्हणून आपापल्या विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

सन 2013 मध्ये अबूजा (नायजेरिया) याठिकाणी झालेल्या ग्लोबल पार्टनरशिप फोरम दरम्यान सुरू करण्यात आलेला GAPMIL हा एक आंतरराष्ट्रीय सहकार कार्यक्रम आहे. ज्याद्वारे जगातील सर्व नागरिकांमध्ये माध्यम आणि माहिती साक्षरतेसाठीची सजगता वाढावी आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्याचा यूनेस्कोचा प्रयत्न आहे. GAPMIL हा कार्यक्रम माध्यम आणि माहिती साक्षरतेच्या विकास आणि परिणामाला जागतिक स्तरावर चालना देण्याच्या दृष्टीने खंबीर भागीदारी कार्यरत करण्यासाठी समर्पित आहे. 

तसेच यासंदर्भातील धोरण, शिक्षण आणि तंत्रज्ञान यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर सक्षम नेतृत्व उभे करणे हाही हेतू आहे. GAPMILचे युवादूत युवकांमध्ये माध्यमातील माहिती साक्षरतेसाठी जागरूकता वाढविण्यासाठी आणि युवा प्रशिक्षणात योगदान देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील परिचालक भागीदार आणि भागधारकांच्या सहकार्याने ही उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करतील.

सर्व युवादूत नागरिकांमध्ये यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी GAPMIL-युवक समिती, GAPMIL-आंतरराष्ट्रीय सुकाणू समिती, GAPMIL-क्षेत्रीय अध्याय आणि उप-अध्यायांना विधायक पाठिंबा देतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhammaratna Jawale elected as gapmil youth ambassadors