सकाळ बातमीचा परिणाम चारवर्षाच्या प्रतीक्षेनंतर धामणीच्या नळाला येणार पाणी

धामणी ता. आंबेगाव येथील सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत मंजूर असलेली सार्वजनिक पाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून बंद होती
Dhamni Ambegaon National Rural Drinking Water Scheme water supply After four years of waiting pargaon pune
Dhamni Ambegaon National Rural Drinking Water Scheme water supply After four years of waiting pargaon punesakal

पारगाव : धामणी ता. आंबेगाव येथील सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत मंजूर असलेली सार्वजनिक पाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून बंद होती त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहे परिसराला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी पुढाकार घेत जिल्हा परिषदेच्या वतीने दुरुस्तीचे काम सुरू केले आज रविवारी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाणी पुरवठा योजनेच्या टाकीत पाणी आल्याने आता नागरिकांना नळा वाटे पाणी मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले याबाबत दैनिक सकाळ ने वारंवार याबाबत वृत्त प्रसिद्ध करून शासन व लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास ही समस्या आणून दिली होती.

सन २०१४-१५ आर्थिक वर्षात तांत्रिक मान्यता असलेल्या हि सार्वजनिक पाणी पुरवठा योजना २०१७ साली चालू होती. संबधित ठेकेदाराचे म्हणणे आहे कि आम्ही योजना चालु स्थितीत जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केली त्यानंतर या योजनेत बिघाड झाल्याने मागील चार वर्षांपासून सदर योजना बंद होती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची दोनदा बैठक बोलावली व तातडीने दुरुस्ती करून योजना सुरळीत सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांनी धामणी येथे येऊन योजनेची पाहणी करून योजना सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले.

पाणी पुरवठा योजनेचे तज्ञ ठेकेदार निलेश टेमकर यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले आणि आज रविवारी पाणी पुरवठा योजनेचे पाणी आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. रामदास जाधव (सरचिटणीस -तालुका राष्ट्रवादी काँग्रेस) आज विवेक वळसे पाटील यांचा वाढदिवस आणि आजच अनेक वर्षे बंद असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या टाकीत पाणी आले ही जणू विवेक वळसे पाटलांच्या वाढदिवसाची धामणी ग्रामस्थांना भेट मिळाल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com