धनगर आरक्षणासाठी सोमवारी सनदशीर मार्गाने आंदोलन 

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

भिगवण : धनगर आरक्षणासाठी सोमवारी (ता.13) सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असुन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने भिगवण बंद न करण्याचा निर्णय येथील पोलिस ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या बैठकीमध्ये सर्वानुमते घेण्यात आला. सोमवारी बंद न करता धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन शासनाच्या प्रतिनिधींना देण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. 

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.13) महाराष्ट्र बंद व भिगवण बंद राहणार असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरत होत्या. त्या पार्श्वभुमीवर येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधींची बैठक पोलिस ठाण्यामध्ये आयोजित केली होती. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, अॅंड. महेश देवकाते, धनाजी थोरात, रामहरी चोपडे, तानाजी पाटील, कुंडलीक बंडगर, तेजस देवकाते, तुषार झेंडे, महेश शेंडगे,अण्णा धवडे पोलिस पाटील तनुजा कुताळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड म्हणाले, बंदमुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांचे  हाल होतात. आंदोलनावेळी अऩेकदा समाजातील युवकांवर गुन्हे दाखल होतात व युवकांचे करिअर अडचणीत येते. धनगर समाजाच्या वतीने भिगवण बंद न ठेवण्याचा निर्णय स्तुत्य आहे. यावेळी महेश देवकाते, हनुमंत बंडगर, रंगनाथ देवकाते, धनाजी थोरात, संपत बंडगर, आबा बंडगर, तुकाराम बंडगर,धनाजी थोरात दादा थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. 

Web Title: For the Dhanagar reservation, on Monday the agitation by the Sun