मोठे होण्यासाठी पवारांवर टीका करणे हा चद्रकांतदादांचा बालिशपणा- मुंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबावर वारंवार टीका करुन मोठे होण्याचा बालिशपणा महसूलमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील करीत असल्याचा हल्लाबोल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबावर वारंवार टीका करुन मोठे होण्याचा बालिशपणा महसूलमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील करीत असल्याचा हल्लाबोल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

पवार कुटुंबावर चंद्रकांत पाटलांनी टीका करणे हा चंद्रकांतदादांचा बालिशपणा असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे युवा नेते माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर माध्यमांना सामोरे जाताना ते बोलत होते. 

यावेळी शहराच्या जडणघडणीत हातभार लावणाऱ्या मान्यवरांचा त्यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या शिलेदारांच्या कर्तृत्व असलेल्या पिंपरीचे शिलेदार या पुस्तकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांची ग्रंथतुला यावेळी करण्यात आली. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, भाऊसाहेब भोईर, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay munde criticize on Chandrakant patil