धनगर समाजाचे चक्का जाम आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पुणे: राज्यातील भाजप सरकारने मागील साडेचार वर्षांपासून आरक्षणच्या नावावर धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे. यासाठी सरकारच्या विरोधात समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती धनगर आंदोलनाचे समन्वयक विकास लवटे, डॉ. शशिकांत तरंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन मागील साडेचार वर्षांपासून सरकार देत आहे. परंतु, प्रत्यक्ष काहीच करत नाही. यामुळे धनगर समाजातील तरुण कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. या सरकारकडुन समाजाची फसवणूक केली आहे. यासाठी २ फेब्रुवारी ला धनगर समाजातील सर्व कार्यकरने, पदाधिकारी, आमदार, मंत्री या सर्व ची धनगर ऐक्य परिषद पुण्यात घेण्यात येणार आहे. या परिषदे १५ फेब्रुवारी ला संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाचे नियोजन केले जाणार आहे.

Web Title: dhangar community' movement for reservation