धनगर आरक्षणास सर्वोच्च प्राधान्य - राम शिंदे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

इंदापूर - धनगर समाजास आरक्षण तसेच सोलापूर विद्यापीठास पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आरक्षणसंदर्भात बारामती तसेच चौंडी येथील गुन्हे मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न गेले जातील, अशी ग्वाही जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली.

पुण्यश्‍लोक राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त येथील अहल्या विकास प्रतिष्ठान तसेच तालुकास्तरीय जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मंत्री शिंदे, आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते अहल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. 

शिंदे म्हणाले, ‘‘आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राचा असून आता तिसऱ्यांदा प्रस्ताव पाठविण्यात येईल. सोलापूर विद्यापीठास होळकर यांचे नाव देण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर होत असून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल. धनगर आरक्षण तसेच चौंडी येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे काढून घेण्याचा अधिकार मंत्रिमंडळात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला आहे.’’

आमदार दत्तात्रेय भरणे म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आपण आमदार बाळासाहेब भेगडे यांची कामे केली, तर आता आमदार झाल्यानंतर तालुक्‍याची विकासकामे करण्यासाठी त्यांची मदत मिळत आहे.

निवडणुकीपुरते राजकारण तसेच त्यानंतर मात्र विकासकारण हे आपल्या कामाचे सूत्र आहे. तालुक्‍यातील गोरगरीब, मागासवर्गीयांची कामे करण्यास आपण सर्वोच्च प्राधान्य देत आहे.’’

या वेळी आमदार बाळासाहेब भेगडे, रामहरी रूपनवर, नारायण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांची भाषणे झाली. भरत शहा, भारत मारकड, शिवाजीराव इजगुडे, विलास वाघमोडे, माउली चवरे, माउली वाघमोडे, तानाजी थोरात, दीपक जाधव, पवन घोगरे उपस्थित होते. स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग मारकड, महेंद्र रेडके तर प्रास्ताविक हरिदास सामसे यांनी केले. सूत्रसंचालन रामभाऊ शिंदे तर आभार पोपट पवार यांनी मानले.

Web Title: dhangar reservation priority ram shinde