रेडझोन हद्द पाचशे मीटरने कमी करण्यची आढळराव पाटलांची मागणी

विलास काटे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

आळंदी (पुणे) : नागरिकांच्या घरांना संरक्षण मिळावे यासाठी संरक्षण विभागाच्या पुणे जिल्ह्यातील खडकी दारूगोळा कारखान्याअंतर्गत रूपीनगर, तळवडे, देहूरोड आणि दिघी मॅगझिन डेपोमधील रेडझोन हद्द पाचशे मिटरने कमी करण्याची मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी (ता. 31) लोकसभेत मांडली.

आळंदी (पुणे) : नागरिकांच्या घरांना संरक्षण मिळावे यासाठी संरक्षण विभागाच्या पुणे जिल्ह्यातील खडकी दारूगोळा कारखान्याअंतर्गत रूपीनगर, तळवडे, देहूरोड आणि दिघी मॅगझिन डेपोमधील रेडझोन हद्द पाचशे मिटरने कमी करण्याची मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी (ता. 31) लोकसभेत मांडली.

मंगळवारी लोकसभेत झालेल्या अधिवेशनात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पिंपरी महापालिका हद्दीतील रेडझोनच्या प्रश्नाबाबत बोलत होते.यावेळी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड या औद्योगिक भागात रेडझोनचा प्रश्न गंभीर आहे. दिघी मॅक्झीन रेडझोन हद्दीत च-होली, दिघी, भोसरी, मोशीचा काही भाग येतो. रूपीनगर, तळवडे, देहुरोडमधे रेडझोड संरक्षण विभागाने टाकला असल्याने नागरिकांना सोयिसुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यातील खडकी येथील दारुगोळा कारखान्याअंतर्गत दिघी दारुगोळा भांडार स्थापन केला. या संदर्भातील संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार दिघी दारूगोळा भांडाराच्या 1145 मीटर त्रिज्येचा परिसर हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. या क्षेत्राला 'रेड झोन' म्हटले जाते. 1145 मीटर त्रिज्येच्या परिसरामधील जमिनीच्या वापराबाबत बंदी लादली. संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयाने या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या समस्या निर्माण झाल्या. पुणे जिल्ह्यातील दिघी, भोसरी, मोशी आणि चऱ्होली या गावांमध्ये असणारी पन्नास हजारांपेक्षा जास्त घरे या निर्णयामुळे प्रभावित झाली. 

सन 2005  मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी आणि संरक्षण अधिकारी यांच्यामध्ये बैठक होऊन एक करार झाला होता. करारानुसार बाह्यसुरक्षित अंतर सहाशे दहा मीटर ने कमी करण्यात येईल असे प्रस्तावित केले होते. यात अॅम्यूनिशन फॅक्टरी खडकीच्या जनरल मॅनेजर यांनी  हा करार संरक्षण मंत्रालयाकडे मान्यतेसाठी पाठवला. पण त्यावर संरक्षण मंत्रालयाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. दरम्यान सदर क्षेत्रात आणखी घरे बांधली गेली. त्यामुळे मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी बाह्य सुरक्षा अंतर पाचशे मीटर पर्यंत कमी करणे आवश्यक आहे.

रुपीनगर, तळवडे आणि देहू रोड या रेड झोनचे मुद्देही खूप महत्त्वाचे आहेत. केंद्र शासनाने पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रातील सेक्टर नं. 22, निगडी या क्षेत्रासाठी बीएसयूपी (BSUP) प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे बारा हजार घराचा समावेश आहे. त्यापैकी सुमारे साडे तिन हजार घरे बांधून झाली आहेत. आणि अठ्ठाविससे घरे लाभार्थ्यांनी व्यापलेली आहेत. हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. परंतु रेडझोनच्या निर्बंधामुळे या प्रकल्पाची दोन हजार  यार्डची  सीमा बाधित होत आहे. या व्यतिरिक्त एमआयडीसीने तळवडे या ठिकाणी चाळिस हेक्टर जमिनीवर आयटी पार्क उभारले आहे. या संदर्भात आवश्यक परवानगी राज्य आणि केंद्र शासनाकडून घेण्यात आली आहे. परंतु रेडझोनच्या दोन हजार  यार्डच्या निर्बंधाबाबतच्या सूचनेमुळे हा प्रकल्प अडचणीत येत आहे. रेडझोन परिसरात असलेली चाळिस हजार वैयत्तिक घरे उध्वस्त करणे खूप कठीण आहे. 

नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी रेडझोन बाह्य सुरक्षा अंतराची मर्यादा पाचशे मीटरपर्यंत करण्याची अधिसूचना काढण्यासंदर्भात आपण संरक्षण मंत्रालयाला सूचित करावे. 

Web Title: dhivajirao adhalrao patil demand to reduce 500 meters from redzone