ढोल-ताशांच्या गजरात ‘महाकरंडक’ सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे - ‘ढोल - ताशावादन ही एक कला आहे. त्यातील ताल व मात्रा यांनाही नियम आहेत. सध्या चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये ढोल-ताशांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे ढोल-ताशावादन आणि वादकांना उज्ज्वल भविष्य आहे,’’ असे मत संगीतकार नरेंद्र भिडे यांनी केले. 

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत आयोजित राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.वेंकीज उद्योग समूहाचे जगदीश बालाजी राव, भोला वांजळे, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सुनील गोडबोले, अशोक गावडे, मोहन ढमढेरे, बालकलाकार गौरी गाडगीळ, अपूर्वा देशपांडे, अनिल दिवाणजी, राजाभाऊ चव्हाण, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव उपस्थित होते. 

गुलाब कांबळे, राजन घाणेकर, गिरीश सरदेशपांडे, राजहंस मेहेंदळे हे स्पर्धेचे परीक्षक आहेत. उद्‌घाटनप्रसंगी स्वाती दातार यांच्या स्वरदा नृत्यसंस्थेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले. 

कलाकार वैष्णवी पाटील हिचे वडील विजय आणि आई ज्योती पाटील यांच्या हस्ते धार्मिक विधी झाले. अभिनेत्री अश्विनी जोग आणि योगेश सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Dhol Tasha Mahakarandak