मिरवणूकांसाठी सज्ज ढोल-ताशा पथके, उपनगरात रंगीत तालमींचा दणदणाट

manjari
manjari

मांजरी - गेली दोन महिन्यांपासून सुरु असलेली वाद्य पथकांची तालीम पूर्ण झाली आहे. ही पथके मिरवणूकांसाठी सज्ज झाली असून सध्या त्यांच्या रंगीत तालमींचा दनदनाट उपनगरात घुमत असलेला पाहवयास मिळत आहे.

गेली काही वर्षांत पारंपारिक ढोल ताशा पथकांना मिरवणूकीसाठी मागणी होऊ लागली आहे. विशेषत: गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूकीत या वाद्य पथकांना विशेष महत्व येत आहे. त्यामुळे अनेक वाद्य पथकांना वर्षभर आगोदरच गणेशोत्सव मिरवणूकीची सुपारी दिली जात असल्याचे कळते. पारंपारिक तालासह विविध नवीन गाण्यावर आधारित तालनृत्ये या पथकांनी बसविलेली आहेत. 

हडपसर, मांजरी, मुंढवा परिसरात सध्या सुमारे पंधराच्या आसपास वाद्य पथके कार्यरत आहेत. मांजरी येथे शंखनाद, पंधरा नंबर येथे विघ्नहर्ता, बंटर शाळेजवळील रूद्रतेज, हडपसर परिसरातील महारूद्र, तालगर्जना, शुभारंभ, शिव आरंभ, सुरताल, मुंढवा येथील भोलेनाथ, एकदिल आदी पथके सध्या सरावाच्या रंगीत तालमीत रंगून गेलेली आहेत.

या पथकांमध्ये शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह नोकरी व्यवसाय करणारे अनेक तरूण केवळ आवडीपोटी सहभागी झालेले आहेत. मुलिंची संख्याही त्यामध्ये उल्लेखनीय आहे.

मगरपट्टा सिटीमध्ये मगरपट्टा सिटीझन्स नावाने ढोल-ताशा पथक कार्यरत आहे. यामध्ये ढोलताशा, लेझीम, झांज अशा वेगवेगळ्या वाद्यांनुसार सराव केला जात आहे. लेझीम पथक हे केवळ महिलांचे असून त्यामध्ये सुमारे चाळीस पंचेचाळीस महिला ठेका धरत आहेत. येथील सुरक्षा अधिकारी विठ्ठल तोरंबे, संदीप नर्के, पोपट आल्हाट, धनाजी जाधव, मल्हारी हगवणे हे सहभागींना प्रशिक्षण देत आहेत.

"मगरपट्टा सिटीमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात व विविध कार्यक्रम राबवून साजरा केला जातो. त्यासाठी येथील वाद्यपथक गेली दीड महिन्यापासून सराव करीत आहे. भिमरूपी, सिंगल रांगडी, डबल रांगडी, ज्ञानोबा तुकाराम, बाजीराव मस्तानी, नाशिक ढोल असे विविध प्रकारचे ताल पथकाने बसविले आहेत.'
निलेश मगर माजी उपमहापौर

"ढोल ताशा पथकांमध्ये सहभागी होण्यासाठी  तरूणाई मोठ्या प्रमाणात उत्सुक असते. त्यांना महिना दोन महिने प्रशिक्षण दिले जाते. जुन्या नव्या गाण्यांच्या धरतीवर पथकांचे तालनाद बसविले जातात. दीड दिवसांपासून अनंतचतुर्थीपर्यंत विविध विसर्जन मुहूर्तासाठी पथकांना सुपारी मिळते. याशिवाय वेगवेगळ्या सण उत्सवांसाठीही पथकाला मागणी असते.'
सोमनाथ लोकरे प्रशिक्षक, शंखनाद ढोलताशा पथक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com