शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी धुमाऴ प्रयत्नशील

मिलिंद संगई
मंगळवार, 26 जून 2018

बारामती - शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी नवीन पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी आजपासून प्रारंभ केला. शहरातील गुनवडी, इंदापूर व भिगवण चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करुन वाहतूकीला दिशा देण्याचे काम आज सुरु झाल्यानंतर चांगलाच फरक जाणवला. चौकात थांबण्याची सवय नसलेल्या बारामतीकरांची या निर्णयानंतर काही काळ चलबिचल झाली खरी मात्र आता ही शिस्त लावून घ्यावी लागणार असे जाणवल्याने बारामतीकरांनीही या प्रयत्नांना मनापासून साथ दिल्याचे चित्र दिसले.

शहराचे पोलिस निरिक्षक म्हणून कार्यभार स्विकारलेल्या अशोक धुमाळ यांना या पूर्वी वाहतूक शाखेत काम केलेले असल्याने त्यांनी बारामतीतील अस्ताव्यस्त वाहतूकीला शिस्त लावण्याचे काम मनावर घेतले. त्यांनी गेले दोन तीन दिवस शहरातील वाहतूकीचा अभ्यास केला, आजपासून त्यांनी कार्यवाहीस प्रारंभ केला. 

गेले अनेक दिवस वाहतूक नियंत्रणाचे आपले काम असते याचा विसर पडलेल्या वाहतूक पोलिसांनाही धुमाळ यांनी कामाला लावले. आज वाहतूक पोलिस चौकात उभे राहून वाहतूक नियंत्रित करतानाचे सुखावह चित्र बारामतीकरांनी अनेक वर्षांनंतर पाहिले. 

दरम्यान, शहरातील अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावण्यासोबतच वाहतूक सुरळीत कशी राहिल या दृष्टीने आपण स्वताः फिरुन प्रयत्न करणार आहोत, असे धुमाळ यांनी नमूद केले. नागरिकांनीही वाहतूकीला अडथळा होईल अशा ठिकाणी दुचाकी किंवा चार चाकी वाहने पार्क करु नयेत, व्यापा-यांनीही आपल्या दुकानातील कर्मचा-यांची वाहने दिवसभर दुकानाबाहेर न लावता दुसरीकडे लावण्याची व्यवस्था करावी, गर्दीच्या दिवशी रस्त्यांवर अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन अशोक धुमाळ यांनी केले आहे. 

नगरपालिकेशी समन्वय ठेवून शिस्त लावणार
दरम्यान मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांच्याशी समन्वय करुन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नगरपालिका व पोलिस यांच्या समन्वयनाने प्रयत्न करु असेही अशोक धुमाळ यांनी सांगितले.

Web Title: Dhumal trying to discipline traffic in the city