मधुमेहींनो, रक्तदाबही ठेवा नियंत्रित!

‘टाइप २’ प्रकारच्या मधुमेही रुग्णांनो, तुम्ही फक्त रक्तातील साखरेबरोबरच रक्तदाब नियंत्रित ठेवावा.
Diabetes
DiabetesSakal
Summary

‘टाइप २’ प्रकारच्या मधुमेही रुग्णांनो, तुम्ही फक्त रक्तातील साखरेबरोबरच रक्तदाब नियंत्रित ठेवावा.

पुणे - ‘टाइप २’ प्रकारच्या मधुमेही रुग्णांनो, (Diabetes Patients) तुम्ही फक्त रक्तातील साखरेबरोबरच रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित (Control) ठेवावा. तसेच, लिपिड व्यवस्थापन करा. त्यातून तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य (Health) चांगले ठेवता येईल, असा विश्वास मधुमेह तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

नव्याने निदान झालेल्या देशातील मधुमेही रुग्णांपैकी ८० टक्क्यांहून जास्त जणांना कोलेस्टरॉलशी संबंधित किमान एक तरी विकार आहे, असा निष्कर्ष राष्ट्रीय पातळीवर केलेल्या ‘इंडिया डायबेटिस स्टडी’तून निघाला आहे.

अतिस्थूलपणाची श्रेणी

भारतातील ‘टाइप २’ डायबेटिस मेलिटसचे नव्याने निदान झाल्यापैकी ५५ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांमध्ये एचडीएल-सी (हाय डेन्सिटी लिपिड - कोलेस्ट्रॉल) कमी आहे. याचा अर्थ असा की या रुग्णांना पुढील काळात हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार होण्याचा धोका अधिक आहे. या सर्वेक्षणात असे देखील सुचवण्यात आले आहे की टाइप २ डायबेटिस मेलिटसच्या सर्व रुग्णांना हायपरटेन्शनचा धोका खूप जास्त आहे. या रुग्णांचा मीन बीएमआय २७.२ नोंदवला गेला आणि इंडियन कॉनसेन्सस ग्रुप मार्गदर्शक सूचनांनुसार ही अतिस्थूलपणाची श्रेणी आहे.

प्रमुख निष्कर्ष...

  • एकूण रुग्णांपैकी ९२.५ टक्के आणि ८३.५ टक्के रुग्ण कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे आणि अँटी-हायपरटेन्शनचे कोणतेही उपचार घेत नाहीत.

  • नव्याने निदान झाल्यापैकी ५५ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांमध्ये हाय डेन्सिटी लिपिड-कोलेस्ट्रॉल कमी आहे.

  • ८२.५ टक्के रुग्णांना कोलेस्ट्रॉलशी संबंधित एक तरी आजार

  • ३७.३ टक्के रुग्णांना उच्च रक्तदाबाचा त्रास असून त्यांचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी आहे.

  • या रुग्णांचा मीन ‘बीएमआय’ (वजन-उंचीचे प्रमाण) २७.२ नोंदवला गेला आणि इंडियन कॉनसेन्सस ग्रुप मार्गदर्शक सूचनांनुसार हा बीएमआय स्थूलतेकडे झुकणारा आहे.

यापूर्वी केलेल्या ‘इंडिया हार्ट स्टडी’नंतर इंडिया डायबेटिस स्टडी’ हे या दिशेने उचलण्यात आलेले आणखी एक पाऊल आहे. भारतामध्ये नव्याने निदान करण्यात आलेल्या ‘टाइप २’ डायबेटिस मेलिटस रुग्णांमधील धोके कोणते व किती प्रमाणात आहेत, हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास केला होता.

- मनीष कपूर, उपाध्यक्ष, एरिस लाइफ सायन्स

काय केले पाहिजे?...

  • उपचारांचा मुख्य भर आहारातील बदल, शारीरिक हालचाली आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यावर असायला हवा

  • पण त्याबरोबरीनेच रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे आणि लिपिड मॅनेजमेंटसारख्या धोरणांचा वापर करावा

  • त्यातून हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजारांच्या समस्येचे निवारण करता येईल

असा केला अभ्यास...

  • देशातील १६ डॉक्टर्सनी २०२०-२०२१ मध्ये सह-लिखित अभ्यास १९०० पेक्षा जास्त फिजिशियन्सच्या सहयोगाने करण्यात आला.

  • देशातील २७ राज्यांमधील सरासरी ४८ वर्षे वयाचे ५०८० रुग्ण सहभागी झाले होते.

  • पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.

उद्देश काय?...

देशात नव्याने निदान करण्यात आलेल्या ‘टाइप २’ डायबेटिस मेलिटस रुग्णांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार होण्याच्या धोक्याचे प्रमाण शोधून काढणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com