अणुपाथ उपकरणाने काही मिनिटांत मधुमेह चाचणी 

Diabetes-test-Machine
Diabetes-test-Machine

पुणे - मधुमेहाची आधुनिक पद्धतीची तपासणी केवळ काही मिनिटांतच घरबसल्या करणे आता शक्‍य होणार आहे. मधुमेह किती प्रमाणात आहे याचा अंदाज घेऊन रुग्ण लवकरात लवकर त्यासाठीचे उपाय अवलंबू शकेल, या दृष्टिकोनातून एक उपकरण बनविण्यात आले आहे. ‘अणुपाथ’ असे या उपकरणाचे नाव असून संशोधक डॉ. विनय कुमार यांनी ते बनविले आहे. त्यांना या उपकरणाच्या संशोधनासाठी अंजनी माशेलकर इन्क्‍ल्यूजिव्ह इनोव्हेशन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.    

सहावी ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ (एनसीएसआय) बाणेर रस्त्यावरील यशदा येथे नुकतीच पार पडली. या परिषदेत डॉ. कुमार यांना गौरविण्यात आले. पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन झाले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ व पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, इंटरनॅशनल लाँन्जिव्हिटी सेंटर, इंडियाचे (आयएलसी इंडिया) अध्यक्ष जयंत उमराणीकर, पीआयसी’चे मानद संचालक प्रशांत गिरबने, आयएलसी इंडियाच्या कार्यकारी संचालिका अंजली राजे आदी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com