संवादाच्या माध्यमातून हिंसा संपेल : अग्निवेश

संवादाच्या माध्यमातून हिंसा संपेल : अग्निवेश

पुणे : "आजही स्त्रियांवर अत्याचार व अन्याय होत असून आपली पितृसत्ताक कुटुंबपद्धती त्याला जबाबदार आहे. महिलांना समान संधी दिली, तर त्या पुरुषांपेक्षाही जास्त प्रगती करून दाखवतील. आज "वर्ल्ड पार्लमेंट' बनवायचे असेल, तर समानतेसोबतच जातपात नष्ट केली पाहिजे. तसेच संवाद हे हिंसेला संपविण्याचे एकमेव माध्यम आहे,'' असे मत "डब्ल्यूएसीपीए'चे मानद सल्लागार स्वामी अग्निवेश यांनी व्यक्त केले.

वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन ऍण्ड पार्लमेंट असोसिएशन (अमेरिका), विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी व श्री रामानुज मिशन ट्रस्ट (तमिळनाडू) यांच्या वतीने आयोजित केलेल्या "बिल्डिंग द वर्ल्ड पार्लमेंट' (जागतिक संसदेची उभारणी) या विषयावरील आंतरराष्ट्रीय गोलमेज परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. संगणतज्ज्ञ डॉ. विजय भाटकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, "डब्ल्यूएसपीए'चे अध्यक्ष डॉ. ग्लेन मार्टिन, "एमआयटी'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, "डब्ल्यूएसपीए'च्या आंतरराष्ट्रीय सल्लागार प्रा. विजया मूर्ती, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

अग्निवेश म्हणाले, ""माणसाची कपड्यावरून ओळख व्हायला नको, तर विचार व आचार यावरून त्याची ओळख व्हावी. तुम्ही जगात कुठेही गेलात किंवा गुगलवर "सर्च' केले, तर तुम्हाला हजारो, लाखो डॉक्‍टर, इंजिनिअर मिळतील; पण शासनकर्ते मात्र मिळणार नाहीत. कारण ही संकल्पनाच अगदी निराळी आहे. 2014 मध्ये जगात युद्धांवर जवळपास 70 हजार बिलियन डॉलर्स खर्च केले; पण त्यातील फक्त 10 टक्के निधी गरिबी हटविण्यासाठी खर्च केला असता तर एकही माणूस गरीब दिसला नसता.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com