अवघ्या 400 रुपयांत डायलेसिस

अवघ्या 400 रुपयांत डायलेसिस

राजीव गांधी रुग्णालयामध्ये गरिबांसाठी सुविधा
येरवडा - पर्णकुटी चौकातील पालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात डायलेसिस केंद्राचे उद्‌घाटन झाले. मात्र, ही आरोग्य सेवा आउटसोर्स केली आहे. परिसरातील गरीब, गरजू रुग्णांवर चारशे रुपयांत डायलेसिस करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.

पुणे महापालिका व कोठारी चॅरिटेबल संस्था यांच्या वतीने राजीव गांधी रुग्णालयातील डायलेसिस केंद्राचे उद्‌घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे शहर पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, आमदार जगदीश मुळीक, योगेश मुळीक, रितू छाब्रिया, अविनाश साळवे, संदीप जऱ्हाड, मारुती सांगडे, राहुल भंडारे, प्रफुल्ल कोठारी, सुरेश गाटे उपस्थित होते.

बापट म्हणाले, 'रुग्णांची प्रत्येक गरज सरकार भागवू शकत नाही. दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढाकार घ्यावा. डायलेसिसचे दर चारशे रुपयांपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न आहे.''

राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या नियोजनाचे काम करण्याची जबाबदारी मिळाली होती, त्या वेळी डायलेसिस रुग्णांसह इतर रुग्णांशी संवाद साधल्यामुळे त्यांची खरी व्यथा कळल्याचे डॉ. वेंकटेशम यांनी सांगितले.

राजीव गांधी रुग्णालयात सध्या रक्तदाब व मधुमेह असणाऱ्या रुग्णांना वेळेवर गोळ्या, औषधे मिळत नाहीत. गरोदर महिलांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यांना ऐनवेळी प्रसूतीसाठी ससूनला जाण्यास सांगितले जाते. त्यामुळे या सुविधा आधी देण्याबरोबरच रक्त, लघवी व थुंकी या तपासण्यांसह डायलेसिस सेवा मोफत दिली गेली पाहिजे.
- डॅनिअल लांडगे, अध्यक्ष, आदर्श मित्र मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com