लग्नसोहळा ठरला राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभावाचे प्रतिक

marriage
marriage

इंदापूर (पुणे) : तालुक्यातील अवैध वाळू, गौणखनिज माफियासाठी कर्दनकाळ ठरलेले तालुक्याचे सिंघम तहसिलदार श्रीकांत पाटील सेतूमध्ये काम करणाऱ्या मनोज जाधव या युवा कर्मचाऱ्यासाठी देवमाणूस, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ हे आपलं माणूस ठरले आहेत. मनोज यांच्या लग्नात पाटील यांनी वरबाप, त्यांच्या पत्नीनी वरमाई तर वाघ यांनी कुटुंबप्रमुखाची भुमिका पार पाडून जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करून लग्नसोहळा पार पाडल्याने हा लग्नसोहळा राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभावाचे प्रतिक ठरला आहे. 

तहसिल कार्यालय सेतू मध्ये संगणकीय काम करणारा मनोज याची घरची परिस्थिती गरीबीची आहे. मात्र सामाजिक आपुलकीने काम करण्याच्या त्याच्या कार्यपद्धतीमुळे तो सर्वांचा आवडता बनला आहे. महेश हा मूळचा इंदापूरचा असून त्याने पडेल ते काम करत पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. आईवडीलांनी पन्नाशी गाठली आहे. घरात कर्ते कोणी नसल्याने तसेच घरची आर्थिक सुबत्ता नसल्याने मनोज याच्या लग्नाचं घोंगडं भिजत पडलं होतं.

लग्नाचं वय उलटून चालले होते. पदवीधर झाल्यापासून मनोज हा अरविंदवाघ, नगरसेवकअनिकेत वाघ यांच्यासोबत घरचा गाडा चालविण्यासाठी काम करू लागला. त्यावेळेपासून वाघ त्याच्या लग्नासाठी प्रयत्नशिल होते. मात्र योग येत नव्हता. मात्र वाघ आणि तहसिलदार पाटील यांच्या प्रयत्नातून मनोजचे लग्न तालुक्यातील शेटफळ हवेली येथील दत्तात्रय पवार यांची कन्या पुनम हिच्याशी जमले. वाघ यांनी लग्नासाठी स्वत:चे राधिका मंगल कार्यालय दिले. विशाल चव्हाण, सुहास बगांळे, पप्पू पवार आदींनी व-हाडींच्या जेवणाचे नियोजन पाहिले. तहसिलदार पाटील, वाघ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर श्री पाटील व सौ. पाटील यांनी किराणा व हळदीचे नियोजन केले.

इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, मंगलसिध्दी दुधसंघाचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र तांबिले, बाळासाहेब करगळ, गणेश कदम यांनी नववधूवरास शुभाशिर्वाद दिले. नवभारत तरूण मित्र मंडळ तसेच बाळासाहेब शिंदे, सुरेश व्यवहारे, नितीन पाटील, नागेश निंबाळकर, चेतन जाधव, संदिप जाधव, निशांत पवार यांनी लग्नसोहळा यशस्वितेसाठी सकारात्मक योगदान दिले. 

श्रीकांत पाटील यांच्या कायदेशीर काम करण्याच्या पद्धतीमुळे भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र लग्नसोहळयात त्यांची दिसलेली माणूसकी तसेच आपुलकी उपस्थितांना माणूसकीचा नवा धडा शिकवून गेली. त्यांच्या सर्वसमावेशक भूमिकेचे कौतुक होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com