उन्हाळ्याच्या सुटीत वेगवेगळे फंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

पिंपरी -  ‘परीक्षा संपल्यावर मित्रांसमवेत चित्रपट पाहायला जाणार आहे. त्यासाठी तिकिटेही काढून ठेवली आहेत,’ ‘आई मला स्मार्टफोन घेऊन देणार आहे. मी स्मार्टफोन दुरुस्तीचे काम शिकणार आहे,’ ‘मी अभिनय शिकणार आहे’, ‘मी दुबईला जाणार आहे...’ हे नियोजन आहे दहावीच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी सुटीतील. 

दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर २९ मार्च रोजी आहे. त्या दिवशी सततचा अभ्यास, परीक्षेतून विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे. त्यामुळे त्यांनी आतापासूनच उन्हाळी सुटीचे नियोजन केल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले. 

चिंचवड येथील अथर्व शिंदे म्हणाला, ‘‘परीक्षा संपल्यावर शुक्रवारी दुपारीच वर्गमित्रांसमवेत चित्रपट पाहायला जाणार आहे. त्याची तिकिटेही आम्ही आताच बुक केली आहेत. त्याच दिवशी रात्री हॉटेलात जेवायला जाण्याचा बेत आहे. उन्हाळ्याच्या सुटीत फुटबॉलचे प्रशिक्षण घेणार आहे. मला फुटबॉलची आवड आहे. पण, दहावीचे वर्ष असल्याने फुटबॉलकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी क्‍लबमध्ये जाणार आहे. तसेच स्पॅनिश भाषाही शिकणार आहे.’’

चिंचवड येथील अभय सिंग म्हणाला, की माझे आई-वडील शिवणकाम करतात. पण, मला संगणक व स्मार्टफोनची खूप आवड आहे. परीक्षा झाल्यावर आई स्मार्टफोन घेऊन देणार आहे. सुटीत मोबाईल दुरुस्तीचे काम शिकणार आहे. त्यामुळे आई-वडिलांना थोडी मदत होईल. पुढील शिक्षण चांगल्या पद्धतीने घेता येईल.

भोसरी येथील साहिल देशमुख म्हणाला, ‘‘मला चित्रपट आवडतात.  त्यातील नायकाच्या भूमिकांचे नेहमीच आकर्षण वाटते व अभिनय करायलाही आवडतो. त्यामुळे मी अभिनय क्षेत्रातील अभ्यास करणार आहे.’’ 

कबड्डीची आवड
‘‘माझे बाबा नोकरीनिमित्त दुबईत असतात. त्यामुळे सुटीत काही दिवस दुबईला जाणार आहे. मला कबड्डीची आवड आहे. मात्र, दोन-तीन वर्षे अभ्यासामुळे कबड्डी खेळणे बंद झाले आहे. तेथून परत आल्यावर कबड्डी प्रशिक्षणाच्या वर्गाला जाणार आहे,’’ असे निगडी येथील सूरज कुंभार याने सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Different phande in the summer holidays for children

टॅग्स