राजकीयपक्षांच्या नेत्यांच्या मर्जीसाठी वेगवेगळ्या लग्नपत्रिका 

सुदाम बिडकर
शनिवार, 12 मे 2018

पारगाव (पुणे) : लग्नसराई जोरात सुरु आहे यावर्षी आधिक महिन्यामुळे लग्नाच्या तीथी कमी असल्याने विवाहाचे ठराविकच मूहुर्त शिल्लक आहेत. विवाह म्हटला की निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका ह्या आल्याच अलीकडच्या काही वर्षामध्ये लग्नपत्रिकांवर वारेमाप खर्च करण्याची क्रेज आली आहे.

पारगाव (पुणे) : लग्नसराई जोरात सुरु आहे यावर्षी आधिक महिन्यामुळे लग्नाच्या तीथी कमी असल्याने विवाहाचे ठराविकच मूहुर्त शिल्लक आहेत. विवाह म्हटला की निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका ह्या आल्याच अलीकडच्या काही वर्षामध्ये लग्नपत्रिकांवर वारेमाप खर्च करण्याची क्रेज आली आहे.

यामध्ये काहीजण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी लग्नपत्रिकेत दोन्ही पक्षांची नावे असली पाहिजे परंतु यांची नावे असली तर ते नाराज नको व त्यांची नावे असली, तर हे नाराज नको यासाठी दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या नावांसाठी दोन स्वतंत्र पत्रिका छापल्या जातात. सर्वसामान्यांसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या नावांचा समावेश असलेली वेगळीच तिसरी पत्रिका बनवली जाते. अशा या गमतीशीर वेगवेगळ्या पत्रिकांची चर्चा मात्र लग्नानंतरही अनेक दिवस जोरात सुरु राहते. 

विवाहसोहळा म्हटला की, लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका ही आलीच पण आलिकडच्या काही वर्षात लग्नपत्रिका मोठ्या आकारात आकर्षक बनविणे त्यामध्ये जास्तीत जास्त नावे छापणे हे जणु प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले आहे. लग्नपत्रिकेवर वारेमाप खर्च केला जातो लग्न पत्रिका मोठ्या आकाराची झापली जाते त्यामध्ये इतरांपेक्षा जास्तीत जास्त नावे असली पाहीजे यामध्ये जणु चढाओढ लागलेली असते. त्यामध्ये जास्तीत जास्त नावे छापणे हे प्रतिष्ठेचे समजले जाते.

नावांमध्ये खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सोसायटींचे चेअरमन, सरपंच, उपसरपंच यांची नावे ठरलेलीच असतात. उत्तर पुणे जिल्हामध्ये प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी व शिवसेना व त्याचबरोबर भाजपही ही तीन्हीही राजकीय पक्ष प्रबळ असल्याने काहीजण आपल्या घरातील लग्नकार्यातील लग्नपत्रिकेत या सर्वपक्षीय नेत्यांची नावे असली पाहीजे परंतु यांची नावे असली तर ते नाराज नको व त्यांची नावे असली तर हे नाराज नको यासाठी दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या नावांसाठी दोन स्वतंत्र पत्रिका छापल्या जातात या पत्रिका बरोबर नियोजन करुन त्या त्या पक्षाच्या कार्यकत्यांना वाटपाचे नियोजन केले जाते सर्वसामान्यांनी दोन्हीही पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावे असलेली स्वतंत्र पत्रिका छापली जाते लग्नसमारंभ होऊन गेला तरी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या छापलेल्या लग्नपत्रिकांची चर्चा मात्र अनेक दिवस चालते.

Web Title: for different politician there is different invitation card