ट्रम्प यांच्याबाबत अंदाज बांधणे कठीण - राम माधव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

पुणे - ‘‘अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात अस्थिरता वाढली आहे. राजनैतिक अधिकाऱ्यांना ट्रम्प यांच्याबाबत अंदाज बांधणे अवघड झाले आहे,’’ असे प्रतिपादन इंडिया फाउंडेशन संचालक आणि भाजप नेते राम माधव यांनी केले.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सिंबायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या वतीने आयोजित ‘भारत आणि भारतीय सागरी सीमा : शाश्वतता, सुरक्षा आणि विकास’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास सुलतान काबुस विद्यापीठचे कुलगुरू डॉ. अली अल्‌ बिमानी, भारत सरकारच्या परराष्ट्र धोरण मंत्रालयाचे सचिव अमर सिन्हा, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, संचालिका शिवाली लवले, सुधीर देवरे उपस्थित होते.

राम माधव म्हणाले, ‘‘चीन, रशिया, सौदी अरेबिया आणि भारत या देशाबाबत ट्रम्प यांची भूमिका नेमकी काय असेल, याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी महासागराशी संबंध बहुतांश देशांना भेट दिली असून जगभरातील लहान मोठ्या देशांना चीनकडून उभ्या केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांचा भारतालाही कसा उपयोग करता येईल, याचा विचार करण्याची आवश्‍यकता आहे.’’

केवळ अमेरिका किंवा रशियाशी संबंध न ठेवता जगातील सर्व राष्ट्रांबरोबर भारताला चांगले संबंध ठेवावे लागणार आहेत. 
- राम माधव, भाजप नेते

Web Title: Difficult to predict the relationship between Trump