विसर्जन मिरवणुकीमुळे वाघोलीत वाहतूक कोंडी

विसर्जन मिरवणुकीमुळे वाघोलीत वाहतूक कोंडी

वाघोली : ''किती ही वाहतूक कोंडी होते. रुग्ण त्यात अडकतात. कशाला हव्यात असल्या मिरवणुका. हा एका अधिकाऱ्याचा स्वर. वाघोलीत राहायचं म्हणजे जीवावर उदार होऊन राहायचं. बापरे काय वाहतूक कोंडी'',हा एका नागरिकाचा स्वर. ''रुग्णवाहिका अडकली. आता कसे होईल त्या रुग्णांचे.'', हा एका महिलेचा स्वर. हे त्यांच्या ओठातून उमटलं. मंगळवार रात्रीच्या गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान वाघोलीत झालेल्या वाहतूक कोंडीने.

मंगळवारी सायंकाळी वाघोलीतील 18 मंडळांचे विसर्जन झाले. पुणे नगर महामार्गावरून ही मिरवणूक जाते. सुमारे सहा तास मिरवणूक चालली. एकीकडे हिंदी मराठी गाण्याच्या तालावर बेभान होऊन थिरकत असलेली तरुणाई तर दुसरीकडे पुणे नगर महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांचा दमछाक. अशी स्थिती होती. मिरवणूक शांततेत पार पडली.

गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष. ढोल ताशा, बँड व झांज पथकाचा खणखणाट तर थिरकण्यात धुंद झालेली तरुणाई अशा उत्साहाच्या वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. या मिरवणुकीत वाघेश्वर तरुण मंडळ, वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब, शिवशक्ती तरुण मंडळ, शिवशंभो मित्र मंडळ, काळुबाई नगर मित्र मंडळ आदी मंडळे सहभागी झाले होते. महिलांचाही तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

वाहतूक स्थिती
1) पुणे नगर मुख्य मार्गावरून मिरवणूक. पुण्याहून नगर कडे जाणाऱ्या बाजूने.
2) पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरून दोन्ही बाजूची वाहतूक यामुळे काही काळ 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा.
3) वाहतूक कोंडीत रुग्ण वाहिका अडकल्या. नागरिकांचीच बाहेर काढण्यात मदत.
4) कोंडी फोडण्यासाठी नागरिक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले.  
5) वाहनचालकांचाही बेशिस्तपणा.
6) वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस, होम गार्ड, अकादमीचे विद्यार्थी, महिला स्वयंसेवक.
7) नियोजनाचा अभाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com