आता फुलणार डिजिटल शेती

Digital-Agriculture
Digital-Agriculture

पुणे विद्यापीठाचा ‘आयडियालॅब्स फ्युचरटेक’ सोबत करार  
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘नव्या तंत्रज्ञानासह डिजिटल शेती’ या विषयावरील उत्कृष्टता केंद्र विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्सला नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीच्या करारावर कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि आयडियालॅब्स फ्युचरटेक व्हेंचर्सचे संस्थापक पंकज दिवाण यांनी नुकतीच स्वाक्षरी केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी ऑनलाइनच्या माध्यमातून कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्‍युबेशन अँड एंटरप्राईजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (इडीआयआय) संचालक मंडळ सदस्य मिलिंद कांबळे आदी यावेळी उपस्थित होत.

या उत्कृष्टता केंद्रामार्फत डिजिटल शेती या विषयावर काम करणाऱ्या स्टार्टअप्सला मार्गदर्शन केले जाईल, यामध्ये डिजिटल प्रयोगशाळा आणि मेकर स्पेसचा समावेश असेल. उत्कृष्टता केंद्रातर्फे नव्या तंत्रज्ञानाशी निगडित कौशल्य अभ्यासक्रम सुरू केले जातील. विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळेल व त्याद्वारे शेतीशी निगडित समस्यांवर उपाय शोधणारी उत्पादने तयार करता येतील.

आयडियालॅब्स फ्युचरटेक व्हेंचर्सचे संस्थापक पंकज दिवाण यांनी ‘उदयोन्मुख तंत्रज्ञानासह डिजिटल शेती’ या विषयावरील सेंटर फॉर एक्‍सलन्स सुरू करण्याबाबत पुढाकार घेतल्याबद्दल इनक्‍युबेशनचे आभार मानले. हे उत्कृष्टता केंद्र चालवताना आयडियालॅब्सकडे असलेल्या कौशल्याचा विद्यापीठाला फायदा होईल, असे पालकर यांनी सांगितले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनक्‍युबेशन सेंटरने नवनवीन संशोधन करण्याकरिता शेतीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. आयडिया लॅब्स यांच्या सहकार्याने शेती क्षेत्रात पुणे विद्यापीठ नक्कीच उल्लेखनीय कार्य करेल.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com