डिजिटल सातबारावरील स्वाक्षरीसाठी मारा चकरा

sat-bara
sat-bara

पुणे - पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह काही जिल्ह्यांत डिजिटल स्वाक्षरीयुक्‍त सातबारा उताऱ्यांचे काम रखडले आहे. त्यामुळे त्यावर स्वाक्षरी घेण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. तर, काही ठिकाणी संकेतस्थळावर सातबारा उतारा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी, दस्तनोंदणीसह बॅंकेतील कर्ज प्रकरणांसह इतर सरकारी कामे खोळंबली आहेत.

राज्यात एकूण दोन कोटी ४९ लाख डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे ५२ लाख ७० हजार सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्‍त करण्याचे काम पूर्ण झाले आहे. केवळ २२ टक्‍के उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्‍त झाले आहेत. पुणे जिल्ह्यात सुमारे १४ लाख ९४ हजार डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध आहेत. त्यापैकी दोन लाख १७ हजार सातबारे स्वाक्षरीयुक्‍त आहेत. स्वाक्षरी नसल्यास तो सातबारा सरकारी कामकाजासाठी वापरता येणार नाही. सध्या कर्मचारी निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे उर्वरित काम रखडल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पुणे आणि सातारा जिल्ह्यासह काही गावांमधील नागरिकांना सातबारा उतारा मिळत नाही. पूर्वी सर्व्हरवर ताण येत असल्यामुळे अडचणी येत होत्या; तर आता तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळावर सातबारा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

राज्यातील ३१ जिल्हे हे ‘क्‍लाऊड प्रणाली’वर आणले आहेत. त्यामुळे सर्व्हरवर ताण येत नाही. परंतु पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे चार जिल्हे ‘क्‍लाऊड यंत्रणे’वर नाहीत. त्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व डिजिटल सातबारा उतारे स्वाक्षरीयुक्‍त करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
- रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com