माओवाद्यांच्या पत्रव्यवहारात दिग्विजय सिंह यांचे अद्याप नाव नाही- सहपोलिस आयुक्त

माओवाद्यांच्या पत्रव्यवहारात दिग्विजय सिंह यांचे अद्याप नाव नाही- सहपोलिस आयुक्त

पुणे- माओवाद्यांच्या पत्रव्यवहारात किंवा पोलिसांच्या आरोपपत्रात दिग्विजय सिंह यांचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पुण्याचे सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत आम्ही कोणत्याही राजकीय नेत्यांचा तपास करीत नसून, आमचा तपास प्रतिबंधित सीपीआय माओवादी सदस्यांवर केंद्रित असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याच्या आरोपावरून देशभरात सुरू असलेल्या कारवाईच्या सत्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांचेही नाव समोर आल्याची माहिती मिळाली होती. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाशी संबंध असल्याच्या आरोपांवरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांच्या पत्रसंवादात दिग्विजयसिंह यांच्या मोबाईल नंबरचाही उल्लेख असल्याचे सांगण्यात आले होते.

या बंदी घातलेल्या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय होता. या संदर्भातील आतापर्यंतच्या कारवाईतून दिग्विजयसिंह यांच्या मोबाईल नंबरचा उल्लेख पोलिसांना सापडले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com