दिलीप बारवकर यांची केंद्रीय विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून निवड

जनार्दन दांडगे 
शनिवार, 16 जून 2018

लोणी काळभोर - देशपातळीवरील अणु ऊर्जा शिक्षण संस्थेच्या रावतभाटा (राजस्थान) येथील केंद्रीय विद्यालयामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील तरुण दिलीप रामचंद्र बारवकर यांची नुकतीच निवड झाली. 

लोणी काळभोर - देशपातळीवरील अणु ऊर्जा शिक्षण संस्थेच्या रावतभाटा (राजस्थान) येथील केंद्रीय विद्यालयामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील तरुण दिलीप रामचंद्र बारवकर यांची नुकतीच निवड झाली. 

अणुउर्जा शिक्षण संस्थेमार्फत देशभरातील अणुउर्जा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम केले जाते. संपूर्ण देशातील एकूण ३० शिक्षण संस्थांपैकी रावतभाटा (राजस्थान) येथे एक संस्था आहे. दरम्यानच्या काळात अणु ऊर्जा शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकभरतीसाठी जागा उपलब्ध झाल्या होत्या. त्यानुसार दिलीप बारवकर यांनी ऑनलाईन अर्ज भरून परीक्षा दिली. या परीक्षेत संपूर्ण देशातून १३ व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. तसेच उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखतीतून निवड झाल्यानंतर दिलीप बारवकर यांची रावतभाटा येथील अणुउर्जा शिक्षण संस्थेच्या केंद्रीय विद्यालयामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली.

बारवकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदी म्हातोबाची येथून पूर्ण केले. तसेच पुढे बारावी व डीएडचे शिक्षण घेवून आपल्याच गावातील श्री म्हातोबा माध्यमिक विद्यालयात ५ वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. याच काळात सावित्रीबाई फुले विद्यापीठातून इंग्रजी विषयातील कला शाखेचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान शासनच्या विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त होऊन, त्यांची माध्यमिक विद्यालयातील नोकरी देखील सुटली. अशा परिस्थितीत हार न मानता त्यांनी स्टेशनरी दुकान, सुतारकाम व शिकवणी घेवून आपला उदरनिर्वाह सुरु ठेवला होता.

ग्रामीण भागातून देशपातळीवर मिळविलेल्या यशाबद्दल दिलीप बारवकर व त्याच्या कुटुंबाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

Web Title: Dilip Barwkar's selection as a teacher in the Central School