‘समग्र दिलीप चित्रे’ येताहेत वाचकांच्या भेटीला

सुशांत सांगवे
रविवार, 15 जानेवारी 2017

पुणे - जे आहे, ते आहे. नाही, नाहीच.
जे जे आहे असताना
त्याच्या सावल्या सर्वत्र आहेत नसतानाही ः
नाही, नाही.

...अशा ख्यातनाम कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या अनेक कविता वाचकांसमोर कधीही आल्या नाहीत. यासह अनेक अप्रकाशित कवितांचा संग्रह प्रथमच वाचकांसमोर येत आहे. त्यासाठी ‘पॉप्युलर प्रकाशना’ने पुढाकार घेतला आहे.

पुणे - जे आहे, ते आहे. नाही, नाहीच.
जे जे आहे असताना
त्याच्या सावल्या सर्वत्र आहेत नसतानाही ः
नाही, नाही.

...अशा ख्यातनाम कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या अनेक कविता वाचकांसमोर कधीही आल्या नाहीत. यासह अनेक अप्रकाशित कवितांचा संग्रह प्रथमच वाचकांसमोर येत आहे. त्यासाठी ‘पॉप्युलर प्रकाशना’ने पुढाकार घेतला आहे.

कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार म्हणून दिलीप चित्रे यांना ओळखले जाते. ते आपल्यात नसले तरी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून आजही ते वाचकांना समृद्ध करतात. असाच अनुभव देणाऱ्या त्यांच्या आणखी काही अप्रकाशित कविता वाचकांसमोर येत आहेत. या अप्रकाशित कवितांचा ‘एकूण कविता - भाग चार’ हा संग्रह तयार झाला आहे. या संग्रहाबरोबरच ‘समग्र दिलीप चित्रे’ही वाचकांसमोर आणले जाणार आहे.

‘पॉप्युलर प्रकाशना’च्या अस्मिता मोहिते म्हणाल्या, ‘‘दिलीप चित्रे यांच्या कवितांचा भाग एक हा संग्रह १९९२ मध्ये प्रकाशित झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी दोन भाग प्रकाशित करण्यात आले. या वेळी चित्रे आपल्यात होते; पण चौथा संग्रह ते आपल्यात नसताना वाचकांसमोर येत आहे. मात्र आधीचे तीन भाग सध्या बाजारात उपलब्ध नाहीत. वाचकांना ते सहज मिळतही नाहीत, त्यामुळे चारही संग्रह एकत्र करून आम्ही या संग्रहांचा खंड तयार करत आहोत. तो ‘समग्र दिलीप चित्रे’ या नावाने लवकरच पाहायला मिळेल, त्यामुळे अनेक अभ्यासक, लेखक-कवी, वाचकांना त्यांच्या कविता एकत्रितपणे वाचायला मिळतील. हा खंड जवळपास बाराशे पानांचा असेल.’’

कुठल्याही कवीचा अभ्यास करताना त्याच्या चांगल्या-वाईट सर्व कविता वाचकांसमोर यायला हव्यात. चांगल्या कविता निवडून केवळ त्याच वाचकांसमोर आल्या, तर कवी पूर्णपणे समजून घेता येत नाही, यावर दिलीप चित्रे यांचा भर होता, त्यामुळे त्यांच्या सर्व प्रकारच्या कविता ‘समग्र दिलीप चित्रे’मधून वाचकांसमोर येतील.

- अस्मिता मोहिते, पॉप्युलर प्रकाशन

Web Title: dilip chitre poem