दिलीप कांबळे यांचा राजीनामा घेण्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

पुणे - ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

लातूर येथील सभेमध्ये कांबळे यांनी ब्राह्मण समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्याच्या विधानाचा ब्राह्मण महासंघाने सोमवारी निषेध व्यक्त केला. महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधून कांबळे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दवे म्हणाले, ""कोणत्याही समाजाविषयी वाईट बोलणे चुकीचे आहे. मंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तीकडून तर अपेक्षाच नाही. तरीही कांबळे यांनी बेजबाबदार वक्तव्य केले. फडणवीस कांबळे यांचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत महासंघ माघार घेणार नाही.'' या निषेधार्थ महासंघातर्फे मंगळवारी (ता. 14) दुपारी चार वाजता गणेश कला क्रीडा मंच येथील कांबळे यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. 

Web Title: Dilip Kamble's demand to resign