दिलीप मोहिते अडचणीत

दिलीप मोहिते अडचणीत

राजगुरुनगर - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारप्रकरणात संशयित आरोपी करण्यात आलेले खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचा अटकपूर्व जामीन अर्ज खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी फेटाळला.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश अंबळकर यांनी हा निकाल दिला. मात्र, प्रकरणाच्या या स्तरावर मोहिते यांच्या भाषणाच्या प्रत्येक वाक्‍याचे मूल्यमापन कोणी करू शकत नाही. जमावाकडून झालेला हिंसाचार आणि पोलिसांना झालेल्या जखमा, मालमत्तेचे नुकसान याचा विचार करावा लागेल.

तसेच तपासणी अहवालानुसार आधीच रॉकेल आणि शस्त्रे घेऊन आलेले लोक, 
काही साक्षीदारांचे जबाब आणि कलम १२०-ब चा विचार करता मोहिते यांना अटकपूर्व जामिनाचा अधिकार नसल्याचे आपले मत झाल्याने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळत आहे, असे त्यांनी निकालपत्रात म्हटले आहे. मोहिते यांच्या बाजूने त्यांचे ॲड. हर्षद निंबाळकर यांनी युक्तिवाद केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com