दिलीप वळसे पाटील झाले राज्याचे गृहमंत्री; निरगुडसर या मूळ गावी झाला जल्लोष

nirgudsar
nirgudsar

मंचर : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर (ता आंबेगाव) या गावात नागरिकांनी एकमेकाला पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. गृहमंत्री पदाचा राजीनामा अनिल देशमुख यांनी दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता . सोशल मीडिया व विविध चॅनेलवर गृहमंत्री  पदाची जबाबदारी वळसे पाटील यांच्यावरच येणार असा अंदाज व्यक्त केले जात होते. या घडामोडीवर गावकऱ्यांचं लक्ष होतं. संध्याकाळी वळसे पाटील गृहमंत्री झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. निरगुडसर  मुख्य चौकात ग्रामपंचायत सदस्यआनंदराव वळसे पाटिल  . महात्मा गांधी तंटामुक्त योजनेचे अध्यक्ष युवराज हांडे देशमुख , संतोष वळसे पाटिल ,राहूलशेठ हांडे देशमुख , मिलिंद वळसे पाटिल , डाॕक्टर अतुल साबळे , रमेश टाव्हरे , रामदास टाव्हरे , निलेश पडवळ , हनुमंत टाव्हरे आदी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकाला पेढे भरून आनंद साजरा केला.
हेही वाचा - Corona Update: रुग्णसंख्येत उतार; राज्यात आज 155 रुग्णांचा मृत्यू
निरगुडसर या खेडेगावात पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत व पंडित नेहरू विद्यालय या दोन्ही कवलारू शाळांमध्ये दिलीप वळसे पाटील यांचे शिक्षण इयत्ता अकरावीपर्यंत झाले. वडील माजी आमदार सहकार महर्षी (स्व )दत्तात्रय वळसे पाटील यांचे बाळकडू दिलीप वळसे पाटील यांना मिळाले होते. मुंबईत उच्च शिक्षण घेत असताना शरद पवार साहेबांचे स्वी सहाय्यक पदावर त्यांनी उत्तम काम केले.  त्यांना वेळोवेळी पवार साहेब यांचे मार्गदर्शन मिळाले. 1990 पासून आतापर्यंत सात वेळा विधानसभेवर ते वाढत्या मताधिक्याने आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातूननिवडून आले आहेत. आतापर्यंत त्यांनी विधानसभा अध्यक्ष व विविध खात्यांची मंत्रीपद समर्थपणे सांभाळली आहे त. शांत मनमिळावू ,अभ्यासू व पवार साहेब यांचे अत्यंत विश्वासू असा दिलीप वळसे पाटील यांचा राज्यात नावलौकिक आहे. कौलारू शाळेत शिक्षण घेतलेला नेता राज्याचा गृहमंत्री मंत्री झाला आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com