'पाकिस्तानची साखर आयात केल्याने साखर उद्योगांच्या अडचणीत वाढ'

Pune
Pune

पारगाव (पुणे) : देशाच्या इतिहासात यावर्षी साखरेचे उच्चांकी उत्पादन झाले आहे त्यातच  सरकारने पाकीस्तान मधुन साखर आयात केल्याने साखर कारखान्यांच्या अडचणीत भर पडली  आहे. लवकरच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार बरोबर चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहीती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व भीमाशंकर साखर कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांनी दिली. 

दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर साखर कारखान्यावर माजी आमदार स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या 20 व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधुन शेतकरी मेळावा व सलिल कुलकर्णी आणि संदिप खरे यांचा आयुष्यावर बोलु काही या गीत संगीताच्या कार्यक्रम आयोजीत केला होता यावेळी श्री. वळसे पाटील बोलत होते. 

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी आमदार पोपटराव गावडे, राम कांडगे, सुर्यकांत पलांडे, शरद बॅकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, संजय काळे, आत्माराम कलाटे, अतुल बेनके, मंगलदास बांदल, सुजाता पवार , सभापती उषा कानडे तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व संचालक, डॉक्टर, वकील ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे आणि सर्व संचालक उपस्थित होते.
श्री. वळसे पाटील पुढे म्हणाले माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील यांनी शरद बॅकेची स्थापणा , भीमाशंकर कारखान्याची निर्मिती, बंधारे, डिंभे धरण या सर्व गोष्टींची सुरवात आमदारकीच्या काळात व आमदार नसतानाही शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या पाठीमागे लागुन केली माजी आमदार बी.डी.आण्णा काळे, आण्णासाहेब आवटे, किसनरान बाणखेले व सर्व सहकार्यांच्या साह्याने तालुक्यात चांगले सामाजीक व राजकीय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला त्यांचा वारसा मला मिळाला तुमची सर्वांची साथ मिळाली 30 वर्ष तालुक्याचे प्रतीनिधीत्व करत असताना परिसरातील रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आदी सामाजीक व भौतिक विकासकामांना प्राधान्य दिले सध्या शेतकर्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणचे साखर उद्योग अडचणीत आला आहे कारखाण्यांना प्रती क्विंटलमागे एक हजार रुपये तोटा होत आहे कारखाने बॅकांचे कर्ज फेडु शकणार नाहीत त्यामुळे बॅका पुढील हंगामात कर्ज देणार नाहीत पर्यायाने कारखाने अडचणीत येणार आहे यातुनही कारखानदार, शेतकरी, तोडणी कामगार यांना दिलासा कसा देता येईल यासाठी शरद पवार प्रयत्न करत असल्याचे सांगीतले.   

पांडुरंग महाराज येवले यांनी मनोगत व्यक्त केले सुत्रसंचालन डॉ. सुदाम खिलारी यांनी केले तर आभार भीमाशंकरचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी मानले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com