वळसे-पाटील यांच्या स्वीय सहाय्यकावर प्राणघातक हल्ला; उपचारासाठी पुण्याला

Manchar
Manchar

पुणे : विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे स्वीय सहाय्यक काळूराम दांगट व त्यांच्या पत्नी यांच्यावर सोमवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाल्यानंतर आता त्यांना आज (मंगळवार) पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.

मंगळवारी पहाटेपासून मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कार्यक्रम दांगट यांना चार जखमा झाल्या असून, त्यांच्या मेंदूलाही ही इजा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सिटीस्कॅन व अन्य तपासण्या व उपचारासाठी त्यांना पुण्याला हलविण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी भेट देऊन दांगट व त्यांच्या पत्नीबरोबर चर्चा केली. दांगट व त्यांच्या पत्नीही घाबरले होते त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हते.

दरम्यान या घटनेचा आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. महिलांनी मंचर पोलिस ठाण्यात निवेदन देऊन याप्रकरणी त्वरित चौकशी करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काळूराम दांगट आणि त्यांच्या पत्नीवर आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे सोमवारी रात्री दीडच्या सुमारास हल्ला झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com