डिंभे धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पारगाव - डिंभे धरण क्षेत्रात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला. गुरुवारी सकाळी धरणातील पाणीसाठा ९७ टक्‍क्‍यांपुढे गेला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी सायंकाळी धरणाच्या पाचही दरवाजांतून सुमारे १७ हजार ६०० क्‍युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोड नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीला पूर आला. 

पारगाव - डिंभे धरण क्षेत्रात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला. गुरुवारी सकाळी धरणातील पाणीसाठा ९७ टक्‍क्‍यांपुढे गेला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी सायंकाळी धरणाच्या पाचही दरवाजांतून सुमारे १७ हजार ६०० क्‍युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोड नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीला पूर आला. 

आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वभागातील गावांमध्ये नदीकाठावर असलेल्या शेतांमध्ये पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीवर असलेले अनेकांचे शेतीपंप पाण्याखाली गेले आहेत. लाखणगाव येथील बेल्हे- जेजुरी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने आज पहाटेपासून या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
तालुक्‍याच्या पूर्वभागात नदीकाठावर असलेल्या पारगाव, काठापूर बुद्रुक,

देवगाव व लाखणगाव परिसरातील नदीच्या कडेला असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतांत पुराचे पाणी घुसले. शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लाखणगाव येथील बेल्हा- जेजुरी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे आज पहाटेपासून या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आंबेगाव, शिरूर व जुन्नर या तीन तालुक्‍यांतील अनेक गावांना जोडणाऱ्या या रस्त्यावरील वाहतूक बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे, अशी माहिती शिवसेना विभागप्रमुख किसन टाव्हरे यांनी दिली. 

पुराचे पाणी नदीकडेच्या शेतांत घुसल्याने शेती वाहून गेली, तर लाखणगाव येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली असल्याचे सरपंच दस्तगीर मुजावर यांनी सांगितले. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या शेतांत पाणी घुसून ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्या संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा दूध संघाचे संचालक दौलत लोखंडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले व देवगावचे माजी सरपंच बाबाजी गावडे यांनी केली आहे.

Web Title: Dimbhe Dam rain water