सावळच्या ज्ञानसागर गुरुकुलच्या चिमुकल्यांनी काढली दिंडी

संतोष आटोळे 
सोमवार, 9 जुलै 2018

शिर्सुफळ (पुणे) : महाराष्ट्रातला सर्वात मोठया प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. आषाढी वारी चे औचित्य साधुन बारामती तालुक्यातील सावळ येथील श्री हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानसागर गुरुकुल मध्ये पालखी सोहळा अर्थात दिंडी सोहळा अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला. 

या पालखी सोहळ्यात ज्ञानसागर चे चिमुकले वारकरी वेशात या सोहळ्यात सहभागी झाले होते. या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत मुक्ताई, संत मीरा या संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. त्यांनी उपस्थित पालक, ग्रामस्थ यांचे लक्ष वेधले. ़

यावेळी वारकरी वेशात टाळ, मृदंग, वीणा, पताका, डोक्यावर तुळस घेऊन पालखी सोहळ्यात उत्साहात सहभाग दर्शविल्यामुळे ज्ञानसागरची ही वारी जणु पंढरपुरी निघाल्याचा प्रत्यय येत होता. गाव प्रदक्षणा पूर्ण करत पालखी हनुमानाच्या मंदिर परिसरात विसावली मंदिरात विद्यार्थ्यांना पालखी सोहळ्याचे महत्त्व व अध्यात्म स्पष्ट करून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करून पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सागर आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे , उपसचिव अल्का आटोळे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे , पल्लवी सांगळे, दिपक बिबे, सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृता यादव, प्रदिप रंदवे, सागर लाड, गिरीष कुमार यांसह सर्व शिक्षक- पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: dindi at sawal dnyansagar gurukul