कटफळच्या चिमुकल्यांनी काढली दिंडी

संतोष आटोळे 
शुक्रवार, 20 जुलै 2018

शिर्सुफळ (पुणे) : महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. आषाढी वारीचे औचित्य साधून बारामती तालुक्यातील कटफळ येथील सदगुरु वामनराव पै.शिक्षण संस्था संचलित अजित दादा इंग्लिश मिडियम येथे पालखी सोहळा अर्थात दिंडी सोहळा अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला. या सोहळ्यात चिमुकल्यांच्या विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेने सर्वांचे वेधून घेतले.

यावेळी वारकरी वेशात टाळ, मृदंग, वीणा, पताका, डोक्यावर तुळस घेऊन पालखी सोहळ्यात उत्साहात सहभाग दर्शविल्यामुळे चिमुकल्यांची ही वारी जणु पंढरपुरी निघाल्याचा प्रत्यय येत होता. दिंडी उत्साहाने श्री क्षेत्र जानाई मंदिर येथे नेण्यात आली. या वेळी हातात भगवे पतके व मुलीनी डोक्यावर तुळस घेतली तर काही विद्यार्थीनी लेजिम मधून आपला आनंद व्यक्त केला. या वेळी झाडे लावा झाडे जगवा, वृक्ष संवर्धनचा संदेश छोट्या मुलांनी तर बेटी बचाव चा संदेश मोठ्या मुलांनी दिला. मुलगी वाचली तर देश वाचेल अश्या भावना व्यक्त केल्या. पालखी गावप्रदिक्षणा करीत मुलांनी जानाई मंदिर येथे अभंग, संतावरील भजने व सत्संग म्हणाले. त्याचप्रमाणे लेझीमचे रिंगण झाले. मुलांनी फुगडी देखील खेळली. 

यावेळी दिंडी चे स्वागत सोसायटीचे माजी अध्यक्ष भारत मोकाशी, माजी उपसरपंच कांतिलाल माकर, जानाई ट्रस्ट चे अध्यक्ष दादाराम झगडे, संजय मोरे, ग्रामसेवक अमोल घोळवे, जहांगीर तांबोळी, आप्पा गुरव यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी स्वागत केले. संस्थेच्या वतीने सचिव संगीता नानासाहेब मोकाशी यांनी सर्व गावकरी, विद्यार्थी, शिक्षक वर्गाचे आभार मानले.

Web Title: dindi by students in katfal