अक्षरधाराचा दीपावली शब्दोत्सव शुक्रवारपासून

Vachak-mahotsav
Vachak-mahotsav

पुणे - अक्षरधाराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त अक्षरधाचे ५९० वे ग्रंथप्रदर्शन मराठी भाषेस समर्पित केले आहे. या ५९० व्या मायमराठी शब्दोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो असणार आहेत. या शब्दोत्सवात ‘सकाळ प्रकाशना’चे स्वतंत्र दालन मांडण्यात येणार आहे. त्यामध्ये सकाळ प्रकाशनाच्या सर्व पुस्तकांवर ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

शब्दोत्सवाच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी साडेसहा वाजता नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहामध्ये होणार आहे. ग्रंथप्रदर्शन १८ ऑक्‍टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहात सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुले राहणार आहे, अशी माहिती अक्षरधाराचे संचालक रमेश राठिवडेकर यांनी दिली. ग्रंथप्रदर्शनामध्ये ‘सकाळ प्रकाशना’ची पुस्तके स्वतंत्र मांडण्यात येणार आहे. त्यामध्ये सकाळ प्रकाशनाचे कोणतेही पुस्तक ३० टक्के सवलतीत देण्यात येणार आहे. या पुस्तकांमध्ये शिवराज गोर्ले यांचे निर्णय घ्यावा कसा, हेल्दी टिफिन, हेल्दी ब्रेकफास्ट, याशिवाय शेतीविषयक पुस्तके, रस्किन बाँड, शशी थरूर, मंगला गोडबोले, श्रुती पानसे अशा अनेक लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com