पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेशासाठी मुदत वाढ 

मिनाक्षी गुरव
शनिवार, 14 जुलै 2018

पुणे : पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेशासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. परिणामी विद्यार्थी सुविधा केंद्रात जाऊन विद्यार्थी अभ्यासक्रमाचे ऑनलाइन प्रवेश अर्जाची नोंदणी करू शकलेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याचे राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने संचालक डॉ. अभय वाघ यांनी जाहीर केले आहे. 

प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम, थेट द्वितीय वर्ष पोस्ट एस.एस.सी. पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम, प्रथम वर्ष पोस्ट एचएससी पदविका औषधनिर्माणशास्त्र, सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी, हॉटेल व्यवस्थापन आणि खाद्यपेय व्यवस्था अभ्यासक्रमाच्या 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने पाच जुलै रोजी दिलेल्या अधिसूचना आणि सरकारी निर्णयानुसार विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्‍यकता राहणार नाही, याची पालक आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे तंत्रशिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच तीन-चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यात अडचणी आल्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज नोंदणी करण्याची तारीख वाढवून द्यावी, अशी मागणी काही शिक्षण संस्थांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार पदविका अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश अर्ज नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या ऑनलाइन प्रवेश अर्ज नोंदणीची सुधारित आणि अंतिम मुदत 
अभ्यासक्रम : ऑनलाइन प्रवेश अर्ज नोंदणीचा सुधारित अंतिम मुदत 
- प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम : 20 जुलै 
- थेट द्वितीय वर्ष पोस्ट एस.एस.सी. पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम : 16  जुलै 
- प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी पदविका औषधनिर्माणशास्त्र, सरफेस कोटिंग    टेक्‍नॉलॉजी, एच.एम.सी.टी. अभ्यासक्रम : 19 जुलै 

Web Title: Diploma and Engineering Course online admission deadline extended