1puneuniversity_6.jpg
1puneuniversity_6.jpg

पुणे विद्यापीठातूनच आता थेट पदवी 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये आतापर्यंत पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम करता येत होता; परंतु आता विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठातूनच पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात बी.एस्सी. हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. 

विद्यार्थी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतात. त्यानंतर विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये थेट पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. पदवी अभ्यासक्रमापासूनच संशोधनाला चालना मिळावी, म्हणून विद्यापीठाच्या आवारातच पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठातच पर्यावरणशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, पृथ्वी आणि वातावरणीय विज्ञान अशा चार विद्याशाखांमध्ये बी.एस्सी. अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 20 जागा असणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. पुणे विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि मेलबर्न विद्यापीठ यांच्या वतीने हे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. 

विद्यापीठात 2016 मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी देखील याप्रकारे बी.एस्सी. अभ्यासक्रम सुरू केला आहे. मात्र, हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या आवारात न होता शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात राबविण्यात येतो. मात्र, या वर्षांपासून विद्यापीठाच्या आवारातच बी.एस्सी. हा पदवी अभ्यासक्रम चार विद्याशाखांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण करता येणार आहे. याशिवाय विद्यापीठ विविध संस्थांसमवेत येत्या शैक्षणिक वर्षांत विविध अभ्यासक्रम नव्याने सुरू करत आहे, असेही डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले. 
 
विद्यापीठाकडून नव्याने सुरू होणारे अभ्यासक्रम 
- मास्टर्स इन फिजिक्‍स इन ऍस्ट्रोफिजिक्‍स 
- मास्टर्स कोर्स इन एस्ट्रो बायोलॉजी 
- प्रॉडक्‍शन कोर्सेस 
- लिबरल आर्टस्‌, प्रॉडक्‍शन डिझाइन, इंडस्ट्री डिझाइन कोर्सेस 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com