विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई व्हावी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

पुणे - पौड रस्त्यावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. एकाच वेळी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

रोटरी क्‍लब पुणे साउथच्या वतीने पौड रस्त्यावरील एआरएआय चौकात बुधवारी सकाळी वाहतूक अभियान राबविले. या चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे पुसट झालेले आहेत. पौड रस्त्याने गावात येताना यू-टर्न घेण्यासाठी सिग्नल नाही. शीलाविहार कॉलनीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे सिग्नलचे दिवे असूनही वाहतुकीचा गोंधळ होत असल्याचे दिसून आले. पुणे साउथ रोटरी क्‍लबचे अध्यक्ष सुधांशू गोरे, सुदर्शन नातू, अरविंद शिराळकर, सदस्य अनिल देशमुख, सुभाष चौथाई आणि श्‍याम कुलकर्णी यांनी वाहतूक अभियानात सहभाग नोंदविला.

नोंदविलेली निरीक्षणे

  • सिग्नलच्या दिव्यांची पुनर्रचना आवश्‍यक 
  • पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल आवश्‍यक
  • झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवणे गरजेचे   
  • पौड रस्त्याने गावात येताना आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग आवश्‍यक 
Web Title: The direction to be taken against vehicles crime