न्यायालयात दिशादर्शकांची गरज

Pune-District-Court
Pune-District-Court

पुणे - न्यायालयीन कामानिमित्त प्रथमच जिल्हा न्यायालयात येणाऱ्यांचा दिशादर्शक फलक नसल्याने न्यायालयातील एखादे कार्यालय, इमारत, कोर्ट हॉल, पार्किंग आणि कॅन्टीन शोधताना गोंधळ होत आहे. न्यायालयाचा परिसर मोठा असल्याने वकील व पोलिसांना विचारत संबंधितांना इच्छितस्थळी पोचावे लागत आहे.

विविध कामानिमित्त हजारो नागरिक दररोज जिल्हा न्यायालयात येतात. गेटमधून आत गेल्यानंतर एकाही ठिकाणी न्यायालयातील कोणती इमारत कुठे आहे, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे गेटपासून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पोचेपर्यंत संबंधित व्यक्ती अथवा पक्षकारांना वकील किंवा पोलिसांची मदत घ्यावी लागते. दिव्यांग व्यक्ती न्यायालयात गेल्यानंतर त्यांना कोर्ट हॉलपर्यंत जाता यावे, यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी दिव्यांगासाठीचे फलक इमारतीच्या आत बसविण्यात आले आहेत. त्याचा इतरांनादेखील फायदा होत आहे. 

मात्र, इमारतीच्या बाहेरील बाजूस आणि न्यायालयाच्या आवारात फलक नाहीत. इमारतींची नावे त्यावर लावण्यात आलेली नाहीत. एखाद्या इमारतीमध्ये कोणते कार्यालय आहे, याबाबत माहिती घ्यायची असल्यास प्रत्यक्ष इमारतीमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना विचारावे लागत आहे. त्यामुळे परिसरात योग्य त्या ठिकाणी आणि पूर्ण माहिती देणारे फलक लावावेत, अशी मागणी पक्षकार करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com