नापासांना थेट दहावीला प्रवेश 'सकाळ विद्या' व तेजस विद्यालय तर्फे कार्यशाळा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

जे विद्यार्थी दहावी अथवा बारावीला प्रथमच बसत आहेत त्यांच्यासाठीही ही सुवर्णसंधी आहे. नापास विद्यार्थ्यांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, शिक्षणाची गरज, अपयश येण्याची कारणे, अपयशाचा विद्यार्थी व पालकांवर होणारा परिणाम, अपयशामुळे खचून न जाता यशाच्या दिशेने वाटचाल कशी करावी त्याचबरोबर नापास विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी करून आत्मविश्‍वास वाढवण्याबाबत हास्ययोगतज्ञ व मोटिव्हेश्‍नल ट्रेनर मकरंद टिल्लू व प्राचार्य विदुला शेटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. 

पुणे : सहावी ते नववीमध्ये किंवा अकरावीत अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्यांना यशाची एक नवीन संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने "सकाळ विद्या' व "तेजस विद्यालय' यांच्यातर्फे मार्गदर्शन कार्यशाळा होत आहे. येत्या रविवारी (ता.17 ) सकाळी होणारी ही कार्यशाळा 14 ते 65 वर्षे वयोगटांतील व्यक्तींसाठी उपयोगी ठरेल. दहावी किंवा अकरावीला अपयश आल्याने शिक्षणात खंड पडला आहे, असे विद्यार्थी तेजस विद्यालयामार्फत 12वी ला प्रवेश घेऊ शकतात. 

जे विद्यार्थी दहावी अथवा बारावीला प्रथमच बसत आहेत त्यांच्यासाठीही ही सुवर्णसंधी आहे. नापास विद्यार्थ्यांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, शिक्षणाची गरज, अपयश येण्याची कारणे, अपयशाचा विद्यार्थी व पालकांवर होणारा परिणाम, अपयशामुळे खचून न जाता यशाच्या दिशेने वाटचाल कशी करावी त्याचबरोबर नापास विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी करून आत्मविश्‍वास वाढवण्याबाबत हास्ययोगतज्ञ व मोटिव्हेश्‍नल ट्रेनर मकरंद टिल्लू व प्राचार्य विदुला शेटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. 

सहावी ते नववीतील नापास विद्यार्थ्यांना थेट दहावीला प्रवेश कार्यशाळा 
कधी : रविवार, 17 जून 
केव्हा ः सकाळी 11 वा. 
कुठे ः टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 
प्रवेश विनामूल्य 
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी : www.vidyaseminars.com, 9850989226 किंवा 7517631022 

Web Title: Directly entering SSC workshop by Sakal Vidya and Tejas Vidyalaya