Pune Crime : पुण्यात डीआरडीओच्या शास्त्रज्ञाला 'एटीएस'कडून अटक; हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला… | DRDO scientist arrested by ATS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Director of DRDO arrested by ATS allegedly found in a honeytrap and giving information to Pakistan in Pune

Pune Crime : पुण्यात डीआरडीओच्या शास्त्रज्ञाला 'एटीएस'कडून अटक; हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला…

पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) शास्त्रज्ञाला एटीएसकडून अटक करण्यात आली असून हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारानं खळबळ उडाली आहे.

संरक्षण संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञाने पुणे येथील त्यांचे कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह (PIO) यांच्याशी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हॉटअॅपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्कात राहिल्याची माहिती समोर आली आहे.

डि. आर. डी. ओ. चे शास्त्रज्ञ यांनी पदाचा गैरवापर करत त्यांचे ताब्यात असलेले संवेदनशील शासकिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत त्यांनी अटक केली आहे.

डीआरडीओ ही संस्था लष्करासाठी युद्ध साहित्य तसेच तंत्रज्ञान विकसीत करते. त्यामुळे तीला संवेदनशील मानलं जातं. दरम्यान या संस्थेचे अधिकाऱ्याने हनीट्रॅपमध्ये अडकून संस्थेची संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे एटीएसने मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पुणे एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.

पुण्यातील डीआरडीओ संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञाला एटीएसने हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप संदेश, व्हॉईस कॉल, व्हिडिओ इत्यादीद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या हस्तकांशी संपर्क साधत होता अशी माहिती दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ने दिली आहे.

जबाबदार पदावर असूनही, DRDO अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून संवेदनशील सरकारी संवेदनशील माहिती बाहेर पाठवली, जी शत्रू राष्ट्राच्या हाती पडल्यास भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो .

दरम्यान महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने, काळाचौकी, मुंबई, यांनी ऑफिशीयल सीक्रेट कायदा 1923 च्या कलम 1923 आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अधिकारी करत आहेत असे एटीएसने सांगितले आहे.

टॅग्स :PakistanPune NewsDRDOATS