पुणे, पिंपरीमधील नागरिकांची खंडित वीजपुरवठ्यामुळे गैरसोय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दोन ठिकाणी जेसीबीने खोदकाम करत असताना महावितरणच्या दोन भूमिगत वाहिन्या तुटल्या. त्यामुळे झालेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे आठ हजार 700 नागरिकांची गैरसोय झाली. 

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दोन ठिकाणी जेसीबीने खोदकाम करत असताना महावितरणच्या दोन भूमिगत वाहिन्या तुटल्या. त्यामुळे झालेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे आठ हजार 700 नागरिकांची गैरसोय झाली. 

पुणे महापालिकेतर्फे लुल्लानगर येथे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. यासाठी ठेकेदाराकडून जेसीबीने खोदकाम सुरू असताना सकाळी साडेअकरा वाजता कोंढवा येथील 22 केव्ही क्षमतेची वीजवाहिनी तुटली. त्यामुळे 20 रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. यातील आठ रोहित्रांना पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरविली. लुल्लानगर ते एनआयबीएम रस्त्यावरील 12 रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे 1200 ग्राहकांची गैरसोय झाली. सायंकाळी सव्वापाचपर्यंत दुरुस्ती काम सुरू होते. 

पिंपरी-चिंचवडला प्राधिकरणामध्ये महापालिकेमार्फत पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम सुरू होते. तेथीलही भूमिगत वाहिनी तुटली. त्यामुळे तीन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणने यातील दोन वाहिन्यांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरू केला. परंतु, विकासनगर व देहूरोड परिसरातील साडेसात हजार ग्राहकांची खंडित वीज पुरवठ्यामुळे गैरसोय झाली. 

उपनगरांतही विजेचा लपंडाव 
पूर्व मोसमी पावसामुळे बुधवारी सायंकाळी पुणेकरांची दाणादाण उडाली. शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाचे पाणी साचल्याने चालकांना वाहने चालविणेही मुश्‍कील झाले होते. तर, शहर व उपनगरांमध्येही विजेचा लपंडाव सुरू होता. 
 

Web Title: Disadvantages due to fragmentary power supply of citizens of pune, pimpri