
गागरे यांनी शुक्रवार ता.४ रोजी येथे भेट दिली असता पशुवैदकीय दवाखाना बंद असल्याचे दिसून आले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती घेतली असता सदर दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचारी हे आठवड्यातून एक ते दोन दिवसच येत असल्याचे सांगण्यात आले.
जुन्नर (पुणे) : आंबे ता.जुन्नर येथील पशुवैदकीय दवाखाना आठवड्यातून एक दोन दिवसच उघडत असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या पशुधनाची उपचारा अभावी हेळसांड होत असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांनी केली आहे.
गागरे यांनी शुक्रवारी (ता.४) येथे भेट दिली असता पशुवैदकीय दवाखाना बंद असल्याचे दिसून आले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती घेतली असता सदर दवाखान्यातील डॉक्टर व कर्मचारी हे आठवड्यातून एक ते दोन दिवसच येत असल्याचे सांगण्यात आले. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून येथील डॉक्टर हे एक महिन्याच्या रजेवर असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आदिवासी दुर्गम भागासाठी हा श्रेणी एकचा दवाखाना असताना तो बंद का आहे याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आदिवासीं लोकांकडे मोठ्या प्रमाणात गाई, म्हशी, शेळ्या आहेत. येथे साथीचे रोग तसेच वन्य प्राण्यांकडून हल्ले झाल्याच्या घटना घडत असतात. यामुळे दवाखाना व डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे आहे. येत्या सात दिवसात जर पर्यायी डॉक्टर उपलब्ध करून दवाखाना खुला झाला नाही तर आठव्या दिवशी आंबे, सुकाळवेढे, हातवीज, हिवरे तर्फे मिन्हेर, सुपेवाडी येथील सर्व गाई, म्हशी, शेळ्या घेऊन पंचायत समितीमध्ये जनावरांसह आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य काळू शेळकंदे , सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गवारी , माजी सरपंच युवराज लांडे , लक्ष्मण दिघे, शरद हिले ,रामा मोडक , नारायण गायकवाड , मधुकर रेंगडे , किसन केदारी आदी उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली