पाणी प्रश्नांसाठी चर्चेविणा सभा त्याग

दत्ता म्हसकर
मंगळवार, 26 जून 2018

जुन्नर : जुन्नर नगर पालिकेची आज मंगळवारी (ता.26) झालेली सर्वसाधारण सभा अध्यक्षांनी गणपूर्ती (कोरम) नसताना घेतली असल्याने ती रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

जुन्नर : जुन्नर नगर पालिकेची आज मंगळवारी (ता.26) झालेली सर्वसाधारण सभा अध्यक्षांनी गणपूर्ती (कोरम) नसताना घेतली असल्याने ती रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

विरोधकांनी पाणी प्रश्न गंभीर स्वरूपाचा असल्याने सभा रद्द करण्याची सूचना मांडली त्यास नगराध्यक्ष शाम पांडे यांनी हरकत घेत सभेत हा प्रश्न चर्चा करून सोडवावा सभा रद्द करणे हा पर्याय होत नसल्याचे सांगून सूचना फेटाळून लावली व सभेचे कामकाज सुरू केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे, आघाडीचे जमीर कागदी यांनी आपल्या नगरसेवकांसह सभात्याग केला. यानंतर नगराध्यक्षानी शिवसेनेच्या चार नगरसेवकासह सभेचे कामकाज पूर्ण केले. 

या सभेस 19 पैकी चार नगरसेवक गैरहजर होते तर एक जागा रिक्त आहे सभेच्या उपस्थिती पत्रकावर 14 जणांच्या सह्या आहेत. ही सभा कायदेशीर असून सभेचे अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी यांनी सभेतील विषय घेतले होते. त्यांच्या पूर्व परवानगीने विषय येणे आवश्यक असताना विरोधकांनी पाणीप्रश्न उपस्थित करून चर्चेची मागणी केली असल्याचे मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी सांगितले.

दरम्यान कोरम अभावी झालेली सभा बेकायदेशीर असून यात मंजूर झालेल्या विषयांची अंमलबजावणी करू नये अशी विरोधकांनी मागणी केली असून यासाठी ते वरिष्ठांकडे दाद मागणार आहेत. आमचा विकासकामांना विरोध नाही. पण पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तो सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत नाही. नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने चर्चेची मागणी केली असे दुबे व कागदी यांनी सांगितले.

Web Title: Discarded discussions for water issue