पिंपरी चिंचवडसह मावळचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला! पवना धरण 98 टक्के भरले

भारत काळे
Sunday, 30 August 2020

मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे मावळ तालुक्यातील पवनाधरण आज सकाळी ९८ टक्के भरले आहे. शनिवारच्या चोवीस तासात धरण परिसरात ८२ मिमी पाऊस झाला असून पाणी साठ्यात ३.५६ टक्के वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ९८ टक्के झाल्याने व धरणात पाण्याचा (लेवा) फ्लो येणे सुरू असल्याने आज सकाळी १० वाजल्यापासून वाजल्यापासून २२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरणातून आज सकाळी १० वाजल्यापासून २२०० क्युसेकने धरणाच्या सांडव्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा पवना पाटबंधारे विभागाने दिला आहे.

Rainfall : गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद!

पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरूवातीचे दोन महिने(जुन व जुलै) पावसाने ओढ दिल्याने मावळातील धरणे भरतील का नाही? अशी शंका निर्माण झाली होती परंतु  ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसाने पवना धरण ९८ टक्के भरले आहे.  मागील वर्षी पवना धरण शंभर टक्के भरले होते.तर मागील वर्षी आजच्या दिवशी ३१५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.तर गेल्यावर्षी ४ ऑगस्ट रोजीच पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने पवना धरणातुन विसर्ग सुरू केला होता. 

विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा

Image may contain: sky, mountain, ocean, outdoor, nature and water

यावर्षी आज रविवारपर्यंत पवना धरण परिसरात एकूण १५४३ मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवार व शनिवारी धरण परिसरात संततधार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली असून पिंपरी चिंचवडसह मावळवाशियांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. १ जुन रोजी अवघा ३५ टक्के पाणीसाठा असलेल्या धरणात आज ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. १ जुन पासून धरणाच्या साठ्यात तब्बल ६३ टक्के वाढ झाली आहे. 

Image may contain: sky, ocean, mountain, outdoor, nature and water

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discharge of 2200 cusecs of water from Pavana dam