पुण्यातून चांगली बातमी : बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

discharged patients are more than infected patients
discharged patients are more than infected patients

पुणे : रुग्णसंख्या वाढत असली तरी, मागचा आठवडा पुणेकरांसाठी दिलासा देणारा ठरला आहे. 27 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत नव्या रुग्णांपेक्षाही बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त राहिल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा हा सरासरी साडेसतरा हजारांच्या दरम्यान सीमित राहिला. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली नसती तर पुण्यात सक्रिय रुग्णांचा आकडा 25 हजारांच्या पुढे गेला असता आणि उपचाराची गरज असणाऱ्या रुग्णांना बेड मिळणे आणखी कठीण झाले असते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात लॉकडाउन लागू केल्यापासून म्हणजे 14 जुलैपासूनच शहरातील रूग्णसंख्या ही हजार ते पंधराशेच्या पटीने वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहरात एकूण रुग्णांचा आकडा हा 57 हजार 528 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली. या सर्वांचा परिणाम शहरात रुग्णांसाठी बेडची संख्या कमी पडू लागली. हा आकडा वाढत असताना उपचार घेऊन बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही गेल्या आठवड्यात एक ते दीड हजाराच्या पटीत राहिली.

27 जुलै ते 2 ऑगस्ट या आठवड्यात 9 हजार 466 नव्या रुग्णांची भर पडली. मात्र याच आठवड्यात उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण 9 हजार 524 होते. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा 19 हजार 135 पर्यंत वाढलेला आकडा कमी साडे सतरा ते अठरा हजारांपर्यंत नियंत्रित राखण्यात यश आले. एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची टक्केवारी ही 25 जुलैपूर्वी 39 टक्के होती. ती 35 टक्‍क्‍यांपर्यंत खाली राहिला. याच कारणामुळे नवे रुग्ण वाढल्यानंतरही या रुग्णांना रुग्णालयांमध्ये जागा मिळणे शक्‍य झाले.

1 ऑगस्टपासून अनलॉक 3 सुरू झाले असून, दुकानांच्या वेळा वाढविण्यात आल्या आहेत. पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रही काही प्रमाणावर कमी झाले आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशावेळी संसर्गाचा धोका अधिक आहे. अशा काळात नव्या रुग्णांची संख्या मर्यादित राहिली आणि बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत राहिली तर आरोग्यसेवा सुरळीतपणे पुरविणे शक्‍य होईल, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

असे झाले रुग्ण कोरोनामुक्त

  • 27 जुलै - 896
  • 28 जुलै - 591
  • 29 जुलै - 2543
  • 30 जुलै - 1315
  • 31 जुलै - 1185
  • 1 ऑगस्ट - 1791
  • 2 ऑगस्ट - 1203

पुण्यातील सद्यःस्थिती

  • ऍक्टिव्ह रुग्ण : 57 हजार 528
  • कोरोनामुक्त रुग्ण : 38 हजार 117
  • एकूण मृत्यू : 1366

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com