शित व उष्ण तत्वांच्या चित्रकृतीतुन विश्वाचा शोध

रमेश मोरे
मंगळवार, 12 जून 2018

जुनी सांगवी (पुणे) : विश्वाची निर्मिती व मानव जन्म दैवी चमत्कार नव्हेत. शीत व उष्ण या स्वाभाविक तत्वांच्या संयुगीय संघर्षामधुन विश्वाची निर्मिती झाली असावी. यातुनच विविध सजिव निर्माण झाले असावेत. याबाबत जुनी सांगवी येथील शीत व उष्ण तत्वांचे अभ्यासक ८२ वर्षीय पद्माकर नगरकर यांच्या या विषयावरील चित्रांचे प्रदर्शन शनिवार ता.१६ जुन ते मंगळवार ता.१९ जुन बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. 

लहानपणापासुन विज्ञानाची आवड व चिकित्सक बुद्धी असलेले पद्माकर नगरकर हे संरक्षण विभागाच्या खडकी येथील अँम्युनेशन फँक्टरी येथे लिपिक या पदावरून निवृत्त झाले आहेत. विज्ञानाविषयीची चिकित्सक ओढ वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांना स्वस्थ बसु देत नाही. ते म्हणतात अग्नी व पाणी एका ठिकाणी राहु शकत नाही. हे पटत असले तरी ही दोन्ही तत्व शरीरात, वातावरणात राहतात. हे असे का याची उत्सुकता स्वस्थ बसु देत नाही. म्हणुन त्यांनी या विषयाचा अभ्यास करून शीत व उष्ण तत्वांचे स्वरूप चित्रांच्या माध्यमातुन साकारले आहे. विश्वाची निर्मिती व मानवाच्या मुळ जन्माविषयी बहुतेक धर्म ग्रंथामधे जी माहिती दिली आहे. ती माहिती विज्ञाननिष्ठ व सुसंगत वाटत नाही. 

पृथ्वीवर निसर्गाची निर्मिती स्वाभाविकपणे नकळत जशी घडते त्याच प्रमाणे विश्वात अमर्याद असणाऱ्या शीत व उष्ण या स्वाभाविक तत्वांच्या संयुगीय संघर्षामधुन विश्व निर्माण झाले असावे. मानव जन्माचे गुढ व त्याची उकल अजुनही विज्ञानाला झालेली नाही. याचा चित्रमय प्रवास त्यांनी चित्रांमधुन साकारला आहे.

Web Title: Discover the universe by painting cold and hot elements