सिध्देश्वर निंबोडीत वाळु माफियांकडुन महसुल कर्मचाऱ्यांना मारहाणची चर्चा

संतोष आटोळे 
शनिवार, 6 एप्रिल 2019

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी येथे वाळुमाफियांनी महसुल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत महसुल प्रशासनाचे अधिकारी नाकारत असले तरी, प्रत्यक्षदर्शी यांनी मारहाण झाल्याचे सांगत आहेत.

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील सिध्देश्वर निंबोडी येथे वाळुमाफियांनी महसुल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत महसुल प्रशासनाचे अधिकारी नाकारत असले तरी, प्रत्यक्षदर्शी यांनी मारहाण झाल्याचे सांगत आहेत. एकंदरीत अवैध वाळू उपशातून मिळत असलेल्या अवैध संपत्तीमुळे अधिकारी आपल्या पदाची प्रतिष्ठाही गमावून बसत आहेत. एकंदरीत वाळुमाफियांची गुंडगीरी रोखणे प्रशासनापुढे आव्हान बनले आहे.

बारामती तालुक्यातील महसुल व पोलिस प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. सिध्देश्वर निंबोडी येथील मदनवाडी तलावामध्ये अवैध वाळू उपसा व वाहतुक मोठ्या प्रमाणात चालु आहे.यामधुन मिळत असलेल्या अमाप संपत्तीमुळे प्रशासनाशी त्यांचे आर्थिक हितसंबंध निर्मान झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे आर्थिक मिंद असल्याने प्रशासनालाही वाळुमाफिया जुमानत नसल्याचे बोलले जात आहे. याचाच प्रत्यय शुक्रवार (ता.05) रोजी मध्यरात्री मदनवाडी तलावामध्ये महसुल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आले असता त्यांना वाळुमाफियांनी मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मदनवाडी तलावातून गेल्या वर्षभरापासुन दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. वाळू उपशामुळे येथील स्थानिकांच्या शेतीसह परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामध्ये मोठ्या अर्थपूर्ण तडजोडी होत असल्याचे सांगितले जात आहे.याबाबत महसुल, पाटबंधारे, पोलिस व ग्रामपंचायत प्रशासन एकमेकांकडे कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी करीत आहे. प्रशासनाच्या या हतबलतेमुळे वाळु माफिया मात्र फोफावले आहेत. यामुळे गावात गुंडशाही वाढत आहे. याचाच परिणाम अधिकारी वर्गाला मारहाण करण्यापर्यत वाळुमाफियांची मजल गेल्याचे सांगितले जात आहे तर पैशापुढे अधिकारी आपल्या पदाची प्रतिष्ठाही विसरल्याची दिसत आहे. यामुळे आता याबाबात जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची गरज आहे.

ग्रामपंचायतीकडुन कारवाईसाठी प्रशासनाला पत्र
याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.यानुरुप गावामध्ये होत असलेल्या अवैध वाळुमाफियांची गावात दहशत निर्मान झाली आहे.तसेच वाळु वाहतुक करताना वेगाचेही भान राखले जात नाही यामुळे अपघात होत आहेत.अशावेळी वाळू माफियांचीच दहशत असल्याने कोणी तक्रारीसाठी पुढे येत नाही.यामुळे आता पर्यत जेवढा अवैध वाळू उपसा झाला आहे त्याचा पंचनामा करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. 

असा काही प्रकार घडल्याचे कळले नाही - विजय पाटील (तहसिलदार बारामती)
''याबाबत बारामतीचे तहसिलदार विजय पाटील यांना विचारले असता त्यांनी असा कोणताही प्रकार घडल्याचे महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला कळविले नाही.
- विजय पाटील (तहसिलदार बारामती)

Web Title: Discussion about revenue workers beaten by land Maufia in siddheshwar Nibodi