राम मंदिरावर संसदेत चर्चा घडवून आणावी : इंद्रेश कुमार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

पुणे : अयोध्येतील राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर
बांधण्याबाबत केंद्र सरकारने अध्यादेश काढावा. तसेच राम मंदिराच्या मुद्यावर संसदेत चर्चा घडवून आणावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ सदस्य आणि मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी केली. संसदेत चर्चा घडवून आणल्यास राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट होईल आणि नेमके कोण अडथळे आणत आहे, हे देशाच्या जनतेला समजेल, असे
त्यांनी स्पष्ट केले.

मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक आणि मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांच्या उपस्थितीत मंगळवारी येथील पूना क्‍लबमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी मंचाचे राष्ट्रीय संयोजक लतीफ मगदूम, विराग पाचपोर, पुणे येथील संयोजक अली दारूवाला उपस्थित होते.

इंद्रेश कुमार म्हणाले, रामजन्मभूमी येथे लवकर राम मंदिर उभारण्यात यावे, अशी जनतेची इच्छा आहे. परंतु त्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि डाव्या आघाडीसह काहीजणांकडून अडथळे आणले जात आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
दाखल करून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

<

निवडणुका जवळ आल्या की राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करण्यात येतो, या प्रश्‍नावर ते म्हणाले, हा मुद्दा भारतीय जनता पक्षाने नव्हे तर काँग्रेसने आणला आहे. 2019 नंतर याबाबत निर्णय व्हावा, असे शपथपत्र काँग्रेसने दिले आहे. राम मंदिराचा मुद्दा हा निवडणुकीत यावा, अशी कॉंग्रेसचीच इच्छा असल्याचा आरोप त्यांनी केला.

राम मंदिराच्या उभारणीला अडथळा आणणाऱ्यांना नागरिकांनी धडा शिकविण्याची गरज आहे. राम मंदिर व्हावे, असा सर्व राजकीय पक्ष, धर्म आणि देशाचाच मूड आहे. राम मंदिर
उभारल्यास तो कोणत्या एका धर्माचा विजय किंवा पराभव राहणार नाही. तर, हा विजय देशातील 125 कोटी जनतेचा असेल. संपूर्ण देश त्याचा उत्सव साजरा करेल, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: The discussion on Ram Mandir in Parliament says Indresh Kumar