
पावसाच्या पाण्याने कचरा कुजल्याने आजार वाढले
उंड्री - काळेबोराटेनगर येथील समृद्धी हॉटेलच्या कॉर्नरवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. पावसाच्या पाण्याने कचर कुजल्याने पसरिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मागिला आठवड्यापासून येथील कचरा उचचला गेला नाही, त्यामुळे साथीचे होण्याचा धोका वाढला आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्यासाठी कचरा उचलून औषध फवारणी करावी, अशी मागणी प्रल्हाद काळे, इम्रान मणियार, विलास शेजवळ यांनी यांनी केली आहे.
विक्रम आल्हाट, सुशील जाधव, बाळासाहेब मोरे, गणेश हांडे, केदार होसुरकर, शिवाजी जाधव, गणेश राऊत म्हणाले की, काळेबोराटेनगर विकसित परिसर असून, नागरिक भल्या पहाटे वॉकिंगसाठी जातात, त्यांना या दुर्गंधीच्या रस्त्याने जावे लागत आहे. या परिसरातील नागरिकांना मोकाट कुत्री-डुकरांचा सामना करावा लागत आहे. पालिकेने मोकाट कुत्री आणि डुकरांचा बंदोबस्त करून नागरिकांनादिलासा द्यावा, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कचऱ्याची समस्या येणार नाही, अशी दक्षता घ्या, असे सांगितले आहे. मोकाट कुत्री आणि डुकरांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना केली जाईल, असे त्यांनी सांगितले.